शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मोडण्यासाठी हॉटेलवर गोळीबार प्रकरणातील एका संशयित आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 19:49 IST

३० मार्चच्या रात्री मिटमिटा येथे दोघांनी हॉटेलवर दोन गोळ्या झाडल्या आणि धमकीपत्र फेकले होते.

औरंगाबाद : आपणास नाकारणाऱ्या मुलीसोबत लग्न जुळविणाऱ्या तरुणाच्या हॉटेलवर गोळीबार करून लग्न मोडण्याचे धमकीपत्र फेकल्याची घटना गेल्या महिन्यात मिटमिटा परिसरात घडली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून एका संशयिताला अटक करून आणले. राहुल सुखदेव गायकवाड (२१, रा. कोखडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित विशाल मनोहर गाडिलकर याचा शोध पोलीस घेत आहेत. विशालने साथीदारांसह ३० मार्चच्या रात्री मिटमिटा येथे येऊन मनीषच्या हॉटेलवर दोन गोळ्या झाडल्या आणि धमकीपत्र फेकले होते. संशयित आरोपी घटनेपासून फरार होते. या गुन्ह्याचा तपास करताना विशालसोबत राहुल गायकवाड होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. राहुल हा अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांना खंडणीच्या गुन्ह्यात वॉण्टेड होता. औरंगाबाद पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधारे त्याला शोधून काढले. तो फरार होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर पोलिसांना त्याला पकडण्याचे सांगितले. तो अनेक दिवसांपासून चकमा देत असल्यामुळे त्याला पकडताच नगर पोलिसांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे समजताच छावणी पोलिसांच्या पथकाने पारनेर न्यायालयाच्या परवानगीने त्याला ताब्यात घेतले आणि औरंगाबादला आणले, असे सहायक पोलीस निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण  मिटमिटा येथील हॉटेल व्यावसायिक मनीष किसन गायकवाड यांचा विवाह ज्या तरुणीसोबत ठरला होता. त्या नियोजित वधूने आरोपी विशालला लग्नासाठी नाकारले होते. याचा राग विशालला आला होता. आरोपी विशाल हा मनीषच्या चुलत बहिणीचा मुलगा आहे. यामुळे ते परस्परांना ओळखतात. तिचे मनीषसोबत लग्न होऊ नये असे यासाठी विशालने अनेक प्रयत्न चालविले होते. मनीषच्या वडिलांच्या मोबाइलवर मेसेज पाठवून आणि फोन करून त्याने हे लग्न रद्द करण्याची धमकीही दिली होती. मात्र गायकवाड कुटुंबाने त्याच्या धमक्यांना भीक न घालता लग्नाची तारीख काढली होती. त्यामुळे विशालने उपरोक्त गुन्हा केल्याचा संशय आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद