शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच निष्पाप मुस्लिम तरुणांचे अटकसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:07 IST

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निष्पाप मुस्लिम तरुणांना देशद्रोही ठरविण्यात येत आहे. मुंबई आणि औैरंगाबाद एटीएस पोलिसांनी आतापर्यंत ज्या तरुणांना इसिसशी संबंधित असल्याचा ठपका ठेवून अटक दाखविण्यात आली त्या तरुणांकडून कोणतेही वादग्रस्त साहित्य जप्त केलेले नाही.

ठळक मुद्देमुस्लिम नुमार्इंदा कौन्सिल : केंद्र, राज्याने इसिसचे संकेतस्थळच बंद करावे

औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निष्पाप मुस्लिम तरुणांना देशद्रोही ठरविण्यात येत आहे. मुंबई आणि औैरंगाबाद एटीएस पोलिसांनी आतापर्यंत ज्या तरुणांना इसिसशी संबंधित असल्याचा ठपका ठेवून अटक दाखविण्यात आली त्या तरुणांकडून कोणतेही वादग्रस्त साहित्य जप्त केलेले नाही. प्रत्येक घरात जे साहित्य सहज उपलब्ध असते तेच साहित्य या तरुणांच्याही घरी होते. मुस्लिम तरुण इसिसकडे आकर्षित होऊ नये असे सरकारला खरोखरच वाटत असेल, तर त्या वेबसाईट बंद कराव्यात, अशी मागणी मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलने एका बैठकीत केली.मुंबई आणि औैरंगाबाद एटीएसने केलेल्या कारवाईनंतर कौन्सिलची तातडीची एक बैठक घेण्यात आली. बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या. मुशाहेद-उल-इस्लाम (तारेख) या तरुणाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो व्यवसायाने ग्राफिक्स डिझायनर आहे. औरंगाबादेत ज्या तरुणांना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांनी काय जप्त केले...? तर उंदीर मारण्याचे पावडर, थिनर, टॉयलेट क्लिनर, लॅपटॉप, सेलफोन, हार्डडिस्क आदींचा समावेश आहे. या साहित्यापासून ते केमिकल हल्ला करणार होते, असे सांगण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेले साहित्य प्रत्येक नागरिकाच्या घरात सहजपणे उपलब्ध असते. या साहित्यामुळे तरुणांना थेट इसिसशी कसा काय संबंध जोडला जाऊ शकतो, मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा हा सरकारचा डाव आहे. मुस्लिम समाजात दहशत पसरावी हा त्यामागचा हेतू आहे. डोंबिवलीमध्ये भाजपचा कार्यकर्ता कुलकर्णी याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह पकडण्यात आले. त्याच्यावर सरकारने कोणती कारवाई केली? असा प्रश्नही बैैठकीत उपस्थित करण्यात आला.कौन्सिलने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, एखाद्या वेबसाईटवर सर्चिंग करणे गुन्हा नाही. सरकारला खरोखरच मुस्लिम समाजाबद्दल आपुलकी असेल तर इसिसच्या सर्व वेबसाईटवर बंदी घातली पाहिजे, जेणेकरून तरुण तिकडे भरकटणारच नाहीत.

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिस