शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

लष्कराप्रमाणे आरोग्य विभागाने परीक्षा रद्द करून नव्याने घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:18 IST

खोकडपुरा येथील अभ्यासिकेत आरोग्य विभागाच्या परीक्षेत उत्तरे पुरविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.

ठळक मुद्देरॅकेटमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सहभागाच्या दृष्टीने चौकशी

औरंगाबाद : लष्करी जवानांच्या भरतीसाठी देशव्यापी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने रविवारी ही परीक्षाच रद्द करण्यात आली. आरोग्य विभागाने रविवारी घेतलेली परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची मागणी जोर धरत आहे.

खोकडपुरा येथील अभ्यासिकेत आरोग्य विभागाच्या परीक्षेत उत्तरे पुरविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांना या ठिकाणाहून काही आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांसह नावे असलेली कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे या रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी अभ्यासिकेवर छापा टाकून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. त्याबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे असलेली कागदपत्रे आढळली आहेत. त्यामुळे पोलिसांबरोबर आरोग्य विभागही चौकशी करीत आहे. या प्रकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे की नाही, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

पेपर फुटला, परीक्षा परत घ्यावीखाजगी वाहनांतून आरोग्य विभागाच्या पेपरची वाहतूक झाली. त्यावर कोणाचीही देखरेख नव्हती. शिवाय पोलिसांनी रॅकेट पकडले आहे. त्यांच्याकडेही प्रश्नपत्रिका आढळल्या आहेत. त्यामुळे झालेली परीक्षा रद्द करावी आणि परत घेतली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) प्रभाकर बकले म्हणाले.

केंद्रात जाण्यापूर्वी पकडलेपरीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून संबंधित व्यक्तींना पकडले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पोलीस चौकशी करीत आहेत. त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त होईल. त्यातून काही समोर येईल.-डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा