शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:10 IST

देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती.

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यावरील झाडाझुडपांना मंगळवारी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने अखेर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला जाग आली आहे. या किल्ल्यावर आगीच्या घटना कायमच्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यादृष्टीने बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले.

देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती. या भीषण घटनेने ऐतिहासिक किल्ला धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे यंत्रणेच्या कारभाराविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. किल्ल्यावर ३० अग्निशमन सिलिंडर असल्याचा दावा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून करण्यात येतो, परंतु मंगळवारच्या घटनेनंतर आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी पाऊल टाकण्यात आले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे संरक्षण सहायक संजय रोहणकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी किल्ल्यावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून पाण्याच्या टाक्या, अग्निशमन यंत्रणेसह आवश्यक बाबींवर प्राधान्याने काम करण्यात येणार आहे.

सर्वत्र काळी राखआगीच्या घटनेने किल्ल्याच्या परिसरात सर्वत्र काळी राख पाहायला मिळत आहे. ही स्थिती पाहून पर्यटक, इतिहास प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या गोष्टींचा विचार आवश्यक- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने विशेष सुरक्षा आराखडा तयार करावा.- उन्हाळ्यात कोरडे गवत सहज पेट घेते. त्यामुळे किल्ल्याच्या आसपासच्या भागात नियमितपणे गवत-कचरा काढणे आवश्यक.- गवत, कचऱ्यापासून ‘सेंद्रिय खत निर्मिती’ होऊ शकते, याची चाचपणी करावी.- कायमस्वरूपी आग प्रतिबंधक पथकाची स्थापना करावी.- उन्हाळ्यात पर्यटन हंगामात, विशेषतः एप्रिल ते जूनदरम्यान स्थायी अग्निशमन पथक तैनात करावे.- सीसीटीव्ही वॉच टॉवर्समधून देखरेख ठेवणे.- किल्ल्यावर धूम्रपान, प्लॅस्टिक वा इतर वस्तू जाळणे, अशा गोष्टींवर सक्तीने बंदी. प्रवेशद्वारावर हवी तपासणी.- दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करणे.- स्वयंसेवी संस्था, ट्रेकिंग ग्रुप यांना ‘फायर वॉच वॉलंटियर्स’ म्हणून प्रशिक्षित करता येईल.- नागरिकांत जनजागृती मोहिमा राबवता येतील.- अग्निशमन विभागाशी समन्वय.- जवळच्या फायर स्टेशनमध्ये विशेष युनिट तयार करणे.- किल्ल्याच्या पायथ्याशी व ठिकठिकाणी पाण्याची टाकी व पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर्स ठेवल्यास आग नियंत्रणात आणता येते.

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन