शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उत्सुकता संपली; सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:04 IST

राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब झाल्याचे पुढे आले होते.

ठळक मुद्देपाच पेक्षा अधिक नावे होती चर्चेत चव्हाण औरंगाबाद येथेच महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते

औरंगाबाद : महावितरणचे औरंगाबाद येथे कार्यरत सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीत राजकीय लॉबिंग होत असल्याची चर्चा रंगल्याने जिल्हाधिकारी पदी कोणाची नियुक्ती होईल याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मागील आठवड्यात उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी बदली  झाल्यानंतर जिल्हाधिकारी पद रिक्त होते.  

राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब झाल्याचे पुढे आले होते. या पदासाठी पाचहून अधिक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, प्रेरणा देशभ्रतार, जे. श्रीकांत, एम.डी. सिंग, औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची मुख्य नावे होती. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी उपयुक्त ठरावे असे शिवसेना नेत्यांना वाटत होते. यामुळे जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील होते. तसेच सरकारमधील इतर दोन पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचेही मत विचारात घ्यावे लागणार असल्याने नियुक्ती लांबत होती. अखेर चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

मनपा आयुक्तांचेही नाव होते चर्चेतबुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी कुणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांत चर्चा झाली. त्यामध्ये मनपा प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांचे नावही पुढे आले होते. परंतु, ते आयुक्तपदी येऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोना काळात प्रभारी जिल्हाधिकारी काम करत होतेबदली, नियुक्ती ही प्रशासकीय बाब असली तरी पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदासाठी राजकीय आणि प्रशासकीय लॉबिंग सुरू झाले होते. मात्र, जिल्ह्याच्या  ३०८ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात अद्यापही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. किंबहुना ती अधिक बिघडण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी काम करीत होते.  दरम्यान, जिल्ह्यात १८ हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्तांचा आकडा सरकला, ग्रामीण भागात ५ हजार ७०० रुग्ण आहेत. यामुळे जिल्हाधिकारी नियुक्तीला होत असलेल्या विलंबाबद्दल नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTransferबदलीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद