शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

अपात्रांना २० लाख रुपयांत सरकारी ‘स्टाफ नर्स’चे नियुक्तीपत्र; गैरप्रकारात धुळे-वांद्रे कनेक्शन

By संतोष हिरेमठ | Updated: June 2, 2025 12:37 IST

राज्यात २०१८ पासून गैरप्रकार; ‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते.

छत्रपती संभाजीनगर : ‘२० लाख रुपये मोजा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवा’, असा उद्योग काहींनी सुरू केला आहे. राज्यात २०१८ पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) अपात्र उमेदवार वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे नियुक्तीपत्र घेऊन आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्थ संस्थांमधील अधिपरिचारिका (गट-क) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २०२३ मध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर २०२४ मध्ये गुणवत्ताधारक आणि पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. या सगळ्यात २५ मार्च २०२५ रोजीचे नियुक्तीपत्र घेऊन एक उमेदवार घाटी रुग्णालयात रूजू होण्यासाठी २७ मे रोजी दाखल झाला. परंतु, इतक्या उशिराने नियुक्ती आल्याने घाटीतील कर्मचाऱ्याला शंका आली. कर्मचाऱ्याने उमेदवाराला अधिक विचारपूस केली, तेव्हा उमेदवार आणि त्याच्यासोबत असलेल्या महिला तत्काळ रूजू करून घेण्याचा आग्रह करीत होत्या. पात्रताधारकांच्या यादीत नावच नसल्याने हा उमेदवार अपात्र असल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्याने आणखी विचारपूस करण्यास सुरुवात करताच उमेदवाराने घाटीतून काढता पाय घेतला.

चौकशी झाली, तर गोंधळ चव्हाट्यावर येईल‘स्टाफ नर्स’ भरती प्रक्रियेत काही उमेदवारांना हेरून पात्र नसणाऱ्यांचे डाक्युमेंट व्हेरीफिकेशन करून नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले जाते. यासाठी १५ ते २० लाख रुपये घेण्याचा ‘उद्योग’ काही जण करीत असल्याचे समजते. नियुक्ती होईपर्यंत टप्प्याटप्प्याने ही रक्कम घेण्यात येते. २०१८ पासून अनेकांकडून पैसे घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे. २०१८ पासून रूजू झालेल्या ‘स्टाफ नर्स’ कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची चौकशी केल्यास अनेक अपात्र नियुक्त झाल्याचे समोर येऊ शकते.

धुळ्याहून कारभारनियुक्तीचा उद्योग करणारे काही जण धुळे येथे कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. यातील एक जण हा वांद्रे येथील आरोग्य संस्थेत कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही या साखळीतील एक व्यक्ती आहे.

...मग म्हणायचे नियुक्तीपत्र बनावटपैसे घेऊन ‘स्टाफ नर्स’साठी नियुक्तीपत्र दिले जाते. शेवटच्या टप्प्यात उमेदवाराला संस्थेत रूजू होण्यास पाठविले जाते. अशावेळी उमेदवार रूजू होण्याची शक्यता वाढते. प्रसंगी मुंबईतही फोन केला जातो, परंतु कोणी शंका उपस्थित केलीच, तर उमेदवाराने बनावट नियुक्तीपत्र आणल्याचे सांगितले जाते. यात उमेदवारच अडचणीत सापडतो. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने उमेदवार पैसे गमावूनही गप्प बसतात. काही उमेदवार पैसे परत देण्याचा तगादा हा ‘उद्योग’ चालविणाऱ्यांकडे लावत आहे.

नवीन भरती प्रक्रियाअसा काही प्रकार झालेला असेल, तर छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता गुन्हा दाखल करतील. पूर्वीची भरती प्रक्रिया संपलेली आहे. आता नवीन भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.- राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि आयुष

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीfraudधोकेबाजी