शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहा उमेदवारांचे अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:34 IST

तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता

ठळक मुद्देआता लक्ष माघारीकडे भाजप नगरसेवकांना आला ‘भाव’

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मैदानात सात जणांनी उमेदवारी अर्ज १ आॅगस्ट रोजी दाखल केले होते. अर्जांची शुक्रवारी छाननी केली असता विशाल नांदरकर यांचा अर्ज कागदपत्रांअभावी बाद ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आता वैध सहा अर्जांपैकी माघार कोण घेणार, याकडे लक्ष लागले आहे. किमान तीन उमेदवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर तिरंगी आणि दोन उमेदवारांनी माघार घेतली तर चौरंगी लढत होण्याचे संकेत आहेत. ५ आॅगस्ट उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. १९ आॅगस्ट रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल.

निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. यामध्ये महायुतीकडून अंबादास दानवे, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी, नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमणे, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांचे अर्ज वैध ठरले आहेत. सहायक निवडणूक अधिकारी संजीव जाधवर यांच्याकडे अर्जांची छाननी करण्यात आली. 

दोन अपक्ष आणि दोन पक्षाचे उमेदवार अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता या मतदारसंघात सध्यातरी आहे. चौरंगी लढत झाल्यास युतीच्या उमेदवाराला फोडाफोडीच्या राजकारणाचा सामना करावा लागेल. शिवाय दानवे यांना अनपेक्षितरीत्या उमेदवारी मिळाल्यामुळे  शिवसेनेतील इतर इच्छुक आणि पक्षातील नेत्यांची मने दुखावली आहेत. त्याअंतर्गत राजकारणाचा परिणाम काय होणार, हे आताच सांगणे अवघड आहे. निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९ असे मतदार आहेत. 

भाजप नगरसेवकांना आला ‘भाव’औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. १८९ च्या आसपास भाजपचे नगरसेवक मतदार आहेत. त्यामुळे भाजपचे नगरसेवकच किंगमेकर ठरणार आहेत. २०१३ साली झालेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक किंगमेकर ठरले होते. त्यावेळी युतीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपच्या मतदारांना सध्या ‘भाव’ आला आहे. 

शिवसेनेला धास्ती मतं फुटीची; मतदारांसाठी ‘व्हीप’ बजावणार

अंदाजे पक्षीय बलाबल पक्ष    मतदार भाजप    १८९शिवसेना    १४१    काँग्रेस    १७०राष्ट्रवादी काँग्रेस    ०८०एमआयएम    ०२८रिपाइं, बसपा, अपक्ष    ०४९एकूण    ६५७

राजकीय समीकरणनिहाय मतदानमहायुती    ३३०महाआघाडी    २५०एमआयएम-अपक्ष    ०७७एकूण    ६५७ 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाVidhan Parishadविधान परिषद