शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

३८ लाख ग्राहकांची अ‍ॅपला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:25 IST

महावितरणच्या अ‍ॅपद्वारे वीज बिल भरण्यासह विविध सेवा आॅनलाईन उपलब्ध असल्यामुळे राज्यभरातील वीज ग्राहकांकडून अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३८ लाख ग्राहक या अ‍ॅपचा वापर करीत असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देमहावितरण : घरी बसल्या विद्युत बिल भरण्यासह विविध सुविधा

औरंगाबाद : महावितरणच्या अ‍ॅपद्वारे वीज बिल भरण्यासह विविध सेवा आॅनलाईन उपलब्ध असल्यामुळे राज्यभरातील वीज ग्राहकांकडून अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३८ लाख ग्राहक या अ‍ॅपचा वापर करीत असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले आहे.महावितरणने मागील तीन वर्षांपूर्वी मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले. या कालावधीत राज्यभरात ३७ लाख ८० हजार ५४५ ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असतील तरीही एकाच युजर नेममधून त्या हाताळता येतात. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना आपले वीज बिल पाहता येते. वीज बिल हे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेटद्वारे याच अ‍ॅपमधूनच घरी बसल्या भरता येते. महावितरणकडे काही कारणास्तव मीटर रीडिंग उपलब्ध झाले नाही, तर त्याबाबतची सूचना ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येते. असा ‘एसएमएस’ प्राप्त झाल्यावर ग्राहक या अ‍ॅपद्वारे मीटर रीडिंग व फोटो पाठवू शकतात. या अ‍ॅपमधून ग्राहकांना नवीन वीज जोडणीसाठीही अर्ज करता येतो. वीज जोडणीच्या अर्जाची सद्य:स्थितीही ग्राहकाला या अ‍ॅपद्वारे जाणून घेता येते. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना प्रामुख्याने खंडित वीजपुरवठा, अवाजवी बिल, रोहित्र बिघाड, बिल प्राप्त न होणे, मीटर समस्या, खांबात वीजप्रवाह, वाकलेला किंवा पडलेला खांब, कमी किंवा जास्त विद्युत दाब, विद्युत अपघात तसेच विद्युत वाहिनीस झाडांच्या फांद्यांचा अडथळा आदी तक्रारी नोंदविता येतात.महावितरणने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेसाठीही ग्राहकांना या अ‍ॅपमध्ये नोंदणी करता येते. कोणत्या विद्युतवाहिनीवरून आपल्याला वीजपुरवठा होतोय हे पाहण्याची सोय उपलब्ध आहे. वीज देयक परिगणक, नाव बदलण्यासाठी अर्ज, विद्युतभार बदलण्यासाठी अर्ज, पुनर्जोडणी शुल्क भरणे, उपयुक्त संकेतस्थळांचे दुवे, वीजचोरीची माहिती कळविणे तसेच ग्राहक सेवेविषयी अभिप्राय नोंदविणे या सुविधाही महावितरणच्या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकाने एकदा या अ‍ॅपवर नोंदणी केल्यास पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही.चौकट ...औरंगाबादेतही अ‍ॅपचा मोठा वापरऔरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतही महावितरणच्या या अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना आपल्या मागील सहा महिन्यांच्या बिलाचा तपशीलही पाहता येतो. गेल्या १२ बिलांचे पैसे भरल्याचा तपशीलही ‘पेमेंट हिस्ट्री’मध्ये ग्राहकांना पाहता येतो. आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल अद्ययावत करण्याची सोयही अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.-----------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलmahavitaranमहावितरण