शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी होम सेंटर कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:49 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने अभियांत्रिकीसाठी होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची औरंगाबाद जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने अभियांत्रिकीसाठी होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची औरंगाबाद जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. मात्र, जालना, बीड, परळी, उस्मानाबाद आणि तुळजापूर येथे अभियांत्रिकीचे एकच महाविद्यालय असल्यामुळे होम सेंटर रद्द करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षा त्याच महाविद्यालयात (होम सेंटर) घेण्यात येत होत्या. मात्र, होम सेंटरवर होणारे गैरप्रकार वाढल्यामुळे होम सेंटर रद्द करण्याची मागणी मागील दोन सत्रांपासून होतआहे.मागील सत्रात साई इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने गाठलेल्या गैरप्रकाराच्या कळसाचा भंडाफोड पोलिसांनी केला. यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळात कुलगुरूंनी होम सेंटर कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केवळ औरंगाबाद जिल्ह्यातच करणे शक्य असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले.औरंगाबाद शहरात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या अधिक असल्यामुळे एका महाविद्यालयातील विद्यार्थी दुसºया ठिकाणी जाऊ शकतात. मात्र, जालना, बीड, परळी, उस्मानाबाद आणि तुळजापूरमध्ये केवळ एकच महाविद्यालय आहे. अभियांत्रिकी वगळता इतर महाविद्यालयांनी अभियांत्रिकीचे परीक्षा केंद्र घेण्यास नकार दिलाआहे. यामुळे त्या पाच शहरांतील होम सेंटर कायम ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नसल्याचे डॉ. नेटके म्हणाले. हे होम सेंटर कायम राहिल्यास विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन होणार आहे.