लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाच्या पवित्र पोर्टलविरोधात १६ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी ११ ते २ वाजेदरम्यान लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय संस्थाचालक महामंडळाने घेतला आहे. याप्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर त्या दिवशी उपोषण करण्यात येणारआहे.आज मंगळवारी औरंगाबादेत व्ही. एन. पाटील विधि महाविद्यालय संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक झाली. या बैठकीत विजय नवल पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राला विद्यमान सरकार सातत्याने सावत्रपणाची वागणूक देत आहे. रोज नवे निर्णय जारी केले जात आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री तसेच राज्य शासनाच्या विरोधात संस्थाचालक व शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अलीकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वत्र असंतोषाचा भडका उडाला. शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे संस्थाचालकांच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण होत आहे. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्व संस्थांचालक एकत्र येत असून, यासंदर्भात ७ जुलै रोजी पुण्यात बैठक झाली. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता जिल्हानिहाय बैठका घेऊन रणनीती आखण्यात येतआहे.आजच्या बैठकीत माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री अनिल पटेल, मिलिंद पाटील, ज्ञानोबा मुंडे, अक्षय शिसोदे, जनार्दन म्हस्के, उद्धव भवलकर, सिद्धांत गाडे, महेश पाटील, आनंद खरात, विजय द्वारकुंडे, महेश उबाळे, गणपतराव गायकवाड, अविनाश जाधव, आय. जी. जाधव, विजय उखळे, सुभाष निकम, जे. बी. नागे, अनिल नखाते, अनिल पाडळकर, शिवाजी बनकर पाटील, नितीन राठोड, बळवंत खळीकर, अंबादास गरूड, किरण पाटील, सय्यद नईम, साईनाथ जाधव, राजेंद्र चव्हाण, धनंजय बोर्डे, अशोक पाटील, मोहन सोनवणे, एन. बी. कुलकर्णी, विष्णू गाडेकर, भाऊसाहेब काळे, नितीन जिवरग, तुषार तांदळे, उदाराज पवार, उत्तमराव पवार, दीपक घुमरे, प्रदीप गरूड, दिगांबर अंकमुळे आदी संस्थाचालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाल्मीक सुरासे यांनी केले. सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले, तर एस. पी. जवळकर यांनी आभार मानले.
संस्थाचालकांचा विरोधी पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:28 IST