शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत आणखी एका विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मंगळवारपासून (दि.२४) सुरुवात झाली. विजयेंद्र काबरा महाविद्यालयात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोनदा कॉपी पकडली. तिस-यांदा कॉपी पकडताच त्या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाच्या कानशिलात लगावली आणि तात्काळ हॉलबाहेर येऊन तिस-या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यावर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देविजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयातील प्रकार : कॉपी पकडणाऱ्या पर्यवेक्षकाला केली मारहाण; विद्यापीठातील विभागाचा विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम. पी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षांना मंगळवारपासून (दि.२४) सुरुवात झाली. विजयेंद्र काबरा महाविद्यालयात परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोनदा कॉपी पकडली. तिस-यांदा कॉपी पकडताच त्या विद्यार्थ्याने पर्यवेक्षकाच्या कानशिलात लगावली आणि तात्काळ हॉलबाहेर येऊन तिस-या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यावर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एम.पी.एड. अभ्यासक्रमाचा ‘अप्लाईड स्टॅटिस्टिक्स इन फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्टस्’ या विषयाची परीक्षा सकाळी १० ते १ या वेळेत सुरू होती. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागातील ‘एमपीसीसी २०१’ या परीक्षा क्रमांकाचा विद्यार्थी हॉल क्रमांक ४० मध्ये परीक्षा देत होता. या विद्यार्थ्याची पर्यवेक्षकाने दोन वेळा कॉपी पकडली. दोन्ही वेळा त्याला समज देऊन सोडण्यात आले. याच विद्यार्थ्याची १२ वाजून ६ मिनिटाला तिसºयांदा कॉपी पकडली. तेव्हा त्या विद्यार्थ्याने थेट पर्यवेक्षक सुहास गिरी यांच्या गालावर चापट लगावली. यामुळे एकच खळबळ उडाली. तेवढ्यात या विद्यार्थ्याने परीक्षेच्या हॉलबाहेर धाव घेऊन तिसºया मजल्यावरून खाली उडी मारण्यासाठी कठड्यावर चढला. पर्यवेक्षकासह इतर परीक्षार्थी धावत बाहेर आले. त्यांनी उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या त्या विद्यार्थ्याला पकडले. त्यास वर ओढून प्राचार्यांच्या कॅबीनमध्ये नेले. प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी क्रांतीचौक पोलिसांना माहिती दिली. १० मिनिटांच्या आत पोलिसांची गाडी तेथे दाखल झाली. पकडलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांकडे दिल्याचे डॉ. सुराणा यांनी सांगितले.क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रारविजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची तक्रार प्राचार्य डॉ. सतीश सुराणा यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दिली. तसेच विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनाही माहिती देण्यात आली.विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा मागील महिनाभरापासून सुरू आहेत. यात एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात कॉपी करताना पकडल्यामुळे त्या विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मागील आठवड्यात शनिवारी डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयातही कॉपी पकडताच विद्यार्थ्याने उडी मारण्याचा ड्रामा केला. मंगळवारी पुन्हा विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात गंभीर प्रकार घडला.विद्यापीठाने डॉ.विक्रम खिलारे यांच्या भरारी पथकाला महाविद्यालयात जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच परीक्षा संचालकांनीही परीक्षा केंद्राला उशिरा भेट दिली...कॉपी पकडल्याचा राग मनात धरून थेट पर्यवेक्षकाला मारहाण करण्यापर्यंत परीक्षार्थीनी मजल मारली. ही धक्कादायक बाब आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागाचा विद्यार्थी आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयात परीक्षा हॉलवर पर्यवेक्षक म्हणून जाण्यास प्राध्यापक तयार होणार नाहीत. यापुढे कोणत्याही प्रकारचे परीक्षा केंद्र घेणार नसल्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला देणार आहे.-डॉ. सतीश सुराणा, प्राचार्य व परीक्षा केंद्र संचालक

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी