शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा बाय दहाच्या खोलीतून आयपीएलवर लाखोंचा सट्टा; औरंगाबादमध्ये आणखी एका सट्टयाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 13:58 IST

आठ दिवसापूर्वी जिंसी पोलिसांनी सट्टा अड्डा चालविणाऱ्या एका बुकीला पकडले होते.

ठळक मुद्देकाचीवाडा येथे विशेष पथकाचा छापा दहा बाय दहाच्या खोलीतून लाखोंचा सट्टा 

औरंगाबाद: इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळविणाऱ्या पिता- पुत्र बुकींना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने काचीवाडा येथे धाड टाकून पकडले. १८ आणि १९ ऑक्टोबर रोजीच्या सामन्यावर शहरातील अनेकांनी अनुक्रमे सुमारे ७० ते ८० लाख आणि २ लाख ३८ हजार ४० रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याचे समोर आले. नेमीचंद शांतीलाल कासलीवाल (५६)आणि आकाश नेमीचंद कासलीवाल (२२रा . काचीवाडा)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, आयपीएल क्रिकेट सामन्यावर शहरात सट्टा खेळला जात असल्याचे सर्वज्ञात आहे. चोरट्या मार्गाने हा सट्टा चालतो. आठ दिवसापूर्वी जिंसी पोलिसांनी सट्टा अड्डा चालविणाऱ्या एका बुकीला पकडले होते. ही कारवाई ताजी असतांना काचीवाडा येथील एका घरात कासलीवाल पितापुत्र सट्टा अड्डा चालवित असल्याची माहिती रात्री पोलिसांना मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, कर्मचारी व्ही. आर. निकम, एम आर. राठोड, व्ही.जे. आडे, एम व्ही विखनकर, ए.आर. खरात , व्ही.एस. पवार,एस . जें सय्यद, महिला कर्मचारी पी.एम . सरसांडे, शृती नांदेडकर यांनी सोमवारी रात्री काचीवाडा येथील घरावर छापा टाकला. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात पोलीस शिपाई इमरान पठाण यांनी सरकारतर्फे तक्रार नोंदविली. 

दहा बाय दहाच्या खोलीतून लाखोंचा सट्टा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दहा बाय दहाच्या खोलीत आरोपी नेमीचंद आणि आकाश हे पितापुत्र आयपीएलचा सट्टा बुकींग करीत असल्याचे दिसून आले. या कारवाईत नेमीचंद आणि आकाशने १८ ऑक्टोबरच्या सामन्यावर ७० ते ८० लाख रुपयांची देवाण- घेवाण झाल्याचे घटनास्थळी सापडलेल्या बुकींग वहि वर सट्टा लावणाऱ्याची नावे आणि रक्कम लिहिलेली दिसून आले. १९ रोजी च्या सामन्यावर २ लाख ३८ हजार ४० रुपयांचा सट्टा शहरातील जुगाऱ्यानी खेळ्ल्याचे समोर आले.

टॅग्स :IPLआयपीएल २०२२AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी