शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला आणखी एक धक्का; शिंदे गटाकडून औरंगाबादच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र जंजाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:43 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त पाच आमदारांचा पाठिंबा दिलेल्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली.

औरंगाबाद: शिवसेनेच्या आमदारांमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर आता पक्ष पातळीवर देखील शिंदे-ठाकरे अशी मोठी लढत पहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या होताना दिसत आहेत. हिंगोलीत संतोष बांगर यांची निवड जाहीर केल्यानंतर आता औरंगाबादच्या जिल्हाध्यक्ष पदी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची शिंदे गटाने नियुक्ती केली आहे.

विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलाढाल झाली आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री पद मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा पक्ष ताब्यात घेण्याकडे वळवल्याने टोकाचा संघर्ष होणार हे स्पष्ट होत आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून दूर केलेल्या बंडखोर आमदार संतोष बांगर यांना शिंदे गटाने हिंगोलीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती दिली आहे. तसेच ठाण्यात देखील शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त पाच आमदारांचा पाठिंबा दिलेल्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना शिंदे गटाने जिल्हाध्यक्ष पद दिले आहे. 

शिंदे यांना खुले समर्थन देऊन थेट उद्धव ठाकरे यांना सवाल करणारे  औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या जवळचे म्हणून जंजाळ यांची ओळख आहे. जंजाळ यांनी युवासेनेच्या उपसचिव पदावरून ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली होती. त्यावेळी जंजाळ यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष आ. अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता शिवसेनच्या जिल्हाध्यक्ष पदी जंजाळ यांची निवड झाल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाट