शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; प्रवेश अर्ज भरण्यास २१ सप्टेंबरपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:24 IST

२० ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात वर्ग सुरू होणार असल्याचे कृषी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्यातील चारही कृषी विद्यापीठांत १० विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maha-agriadmission.in या  संकेतस्थळावर नोंदणी करावी

औरंगाबाद/पुणे : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना येत्या २१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल. २० ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात वर्ग सुरू होणार असल्याचे कृषी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत १० विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ३८ महाविद्यालय कार्यरत आहेत. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ११, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत ९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत  ११ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १ हजार ३३५ एवढी आहे.

या महाविद्यालयांमध्ये  कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान ,अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन हे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेली शैक्षणिक सामायिक प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येकी विद्याशाखेची स्वतंत्र सामायिक परीक्षा घेण्यात आली. सामायिक प्रवेश परीक्षेचे ७० टक्के गुण आणि पदवीचे ३० टक्के गुण विचारात घेऊन प्रवेश दिले जाणार आहेत. 

असे राहील चारही कृषी विद्यापीठांचे ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रकप्रवेश प्रक्रिया सुरुवात : १० सप्टेंबर अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : २४ सप्टेंबरतक्रार नोंदणीचा कालावधी : २५ ते २८ सप्टेंबरअंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे: ३० सप्टेंबरपहिल्या फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी: ५ ऑक्टोबरपहिल्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी :६ ते ८ ऑक्टोबरदुसऱ्या फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी: १० ऑक्टोबरदुसऱ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : १२ते १४ ऑक्टोबरतिसऱ्या फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी: १७ ऑक्टोबरतिसऱ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : १९ ते २१ ऑक्टोबररिक्त जागांच्या यादीची प्रसिद्धी करणे : २३ ऑक्टोबरचौथी प्रवेश फेरी राबविणे : २६ ते २७ ऑक्टोबरवर्ग सुरू करण्याचा दिनांक : २० ऑक्टोबर

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन  पद्धतीने राबविली जाणार असून प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maha-agriadmission.in या  संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रcollegeमहाविद्यालय