शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादेत घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:35 IST

दिवाळसणाच्या तोंडावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यापासून शहरात घरफोडीच्या घटना सलग सुरूच आहेत. खिडकी गँग अजूनही सक्रिय असावी असे मंगळवारी पहाटे झालेल्या चोरीच्या तीन घटनांवरून समोर आले.

ठळक मुद्दे खिडकी गँग सक्रिय? : पोलीस यंत्रणा मागावर

औरंगाबाद : दिवाळसणाच्या तोंडावर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यापासून शहरात घरफोडीच्या घटना सलग सुरूच आहेत. खिडकी गँग अजूनही सक्रिय असावी असे मंगळवारी पहाटे झालेल्या चोरीच्या तीन घटनांवरून समोर आले. बँक अधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी नऊ तोळे सोने, चांदी आणि साडेतीन हजार रुपये लांबविले. तिसºया मजल्यावरील खिडकीच्या ग्रील तोडून चोरटे पैठणगेट, टिळकपथवरील दोन कपड्याच्या दुकानांत घुसले. या तिन्ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडल्या.सिडकोतील वीर सावरकरनगरात राहणारे श्रीनिवास अशोक पवार हे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या झोनल कार्यालयात सहायक व्यवस्थापक आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टीहून त्यांची शहरात मे महिन्यात बदली झाली. बँकेने दिलेल्या वीर सावरकरनगरातील चार खोल्यांच्या घरात ते राहत होते. बँकेच्या कार्यशाळेनिमित्त ते चार दिवसांसाठी हैदराबादला गेले आहेत. त्यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने त्यांची आई व बहीण सोमवारी जालन्याहून आल्या होत्या. रात्री दोन वाजेपर्यंत तिघींनी गप्पा मारल्या. चार खोल्यांच्या घरातील एका खोलीमधील कपाटात दागिने आदी किमती वस्तू ठेवल्या होत्या. त्या रूमला आतून बंद करून तिघीही दुसºया खोलीत झोपल्या. मध्यरात्री चोराने नेमके दागिने आणि रोकड असलेल्या खिडकीची बाहेरून ग्रील उचकटली. त्यातून घुसून चोरट्यांनी कपाटातील चाव्या घेतल्या. कपाटातील नऊ तोळ्यांचे दागिने, चांदी आणि साडेतीन हजारांची रोकड लांबवली. विशेष म्हणजे कपाटातील बेन्टेक्सच्या दागिन्यांना चोरट्यांनी हातही लावला नाही. चोरीचा प्रकार पवार कुटुंबियांच्या सकाळी लक्षात आला. त्यांनी सिडको पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक, ठसेतज्ज्ञ, श्वान पथक, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, फौजदार विजय पवार यांनी धाव घेतली.चोरांचा माग काढण्यास श्वान अपयशीश्वान पथकातील संजय महेर, सचिन हरणे, पोपट आळंजकर यांनी श्वान हिराच्या मदतीने चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे वाहनाने आल्यामुळे श्वान हिराला त्यांचा माग काढणे अशक्य झाले.रेकी केल्याचा अंदाजवीर सावरकरनगरचा परिसर अतिशय शांत आहे. पवार यांच्या घराजवळच एक जीम आहे. दिवसादेखील या परिसरात शांतता असते. चोरांनी दिवसा या भागाची पाहणी केल्यानंतर मध्यरात्री चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कपड्यांची दुकाने फोडलीअतिशय गजबजलेल्या पैठणगेट, टिळकपथवरील दोन दुकाने फोडून चोरांनी २७ हजार ५०० रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निदर्शनास आला. विनोद लक्ष्मणदास चोटलानी (५२, रा. प्लॉट क्र. १७३, सिंधी कॉलनी) यांचे टिळकपथवर राजधानी हॅण्डलूम हे दुकान आहे. त्यांच्या शेजारी महेश बिहारीलाल नाथानी (रा. विष्णूनगर) यांचे किंग्स अ‍ॅण्ड किडस् दुकान आहे. या दोघांच्या दुकानाच्या छतावरून चोरटे जिन्याने पहिल्या मजल्यावर आल्याचा कयास आहे. गल्ल्याचे ड्रॉवर उचकटून एका दुकानातून २५ हजारांची रोख, तर दुसºया दुकानातील अडीच हजार लांबवले. हा प्रकार सकाळी दुकानात प्रवेश करताच दोघांच्या निदर्शनास आला. त्यावरून त्यांनी तात्काळ क्रांतीचौक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार शेख एजाज तपास करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस