शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग; वडील, भावाने चाकूने भोसकून जावयाचा केला खून

By सुमित डोळे | Updated: July 26, 2024 13:16 IST

प्रेमविवाहानंतर सारे शांत झाल्याचे वाटले; तीन महिन्यानंतर अचानक सासरे, मेव्हण्याने हल्ला करून तरुणाला संपवले

छत्रपती संभाजीनगर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता. इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके (२५) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोट व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे लहानपणीची मैत्रिण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, भिन्न धर्मामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्याने २ मे रोजी ते घरी परतले. त्यानंतर त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र, विद्याच्या कुटुंबाच्या मनातला राग गेला नव्हता. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलै रोजी अमित परिसरात फिरत असताना गीताराम व आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केले. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी अमितची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

संतप्त पत्नीचा पोलिस ठाण्यात ठिय्याअमितवरील हल्ल्याला ११ दिवस उलटूनही मारेकरी वडील व भावाला जवाहरनगर पोलिसांनी अटक न केल्याने अमितच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत त्याच्या कुटुंबीयांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होते. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शिवाय, सासरा गीताराम व आप्पासाहेबव्यतिरीक्त पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद