शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

अन् ती भेट अखेरची ठरली

By admin | Updated: June 4, 2014 01:36 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘मी आजपासूनच विधानसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे, तुम्हीही तयार व्हा,’ असा आदेश गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना तीन दिवसांपूर्वी दिला होता.

 शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘मी आजपासूनच विधानसभेच्या प्रचारास सुरुवात केली आहे, तुम्हीही तयार व्हा,’ असा आदेश गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद शहरातील कार्यकर्त्यांना तीन दिवसांपूर्वी दिला होता. हा आदेश व शहराची त्यांची ती भेटही अखेरचीच ठरली. केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे दि.३१ मे रोजी पहिल्यांदाच शहरात आले होते. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त चौंडी येथे होणारा कार्यक्रम व त्यानंतर भगवानगडाला भेट देण्यासाठी ते जाणार होते. मूळ कार्यक्रमानुसार ते विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने चौंडीला जाणार होते; परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले. प्रसन्नता व विलसत्या हास्याने त्यांचा चेहरा अधिकच खुलला होता. मुंडेसाहेब हे हजरजबाबी व चांगले पट्टीचे वक्ते. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात त्यांनी उपस्थितांना हसविले, काहींना चिमटे काढले व सर्वांना विधानसभा लढविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. तुम्ही तयार व्हा किंवा होऊ नका. मी मात्र आजपासूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास लागलो आहे, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांच्या बोलण्यात मोठा आत्मविश्वास होता. ग्रामविकासाच्या अनेक कल्पना स्पष्ट करून रोजगार हमी योजनेतील अडचणी सोडविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला होता. साहेब, आम्हाला व्याजासह परत द्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले होते की, मुंडेसाहेब आपल्या हातून देशाची चांगली सेवा घडो. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दानवेसाहेब मुंडेसाहेब आम्ही केंद्राला फक्त तीन महिन्यांसाठी उसने दिलेत. तीन महिन्यांनंतर आम्हाला आमचे साहेब व्याजासह परत द्या. त्यांच्या हातून राज्याची सेवा घडणार आहे. राज्याची सेवासुद्धा देशसेवाच आहे. त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता; परंतु काळाने मंगळवारी त्यांच्यावर झडप घालून त्यांना आपल्यातून हिरावून नेले, अशी व्यथा कार्यकर्ते मांडत होते. ४मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादशी गोपीनाथ मुंडे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. औरंगाबादचा त्यांचा पहिला संबंध आला, तो आणीबाणीनंतर १९७५ मध्ये. पुण्यात विधि शाखेत शिकत असताना गोपीनाथ मुंडे यांनी तळेगाव मावळ येथे झालेल्या जनसंघाच्या अधिवेशनात प्रमोद महाजन यांच्यामुळे उपस्थिती लावली. तेथे त्यांची भेट वसंतराव भागवतांशी झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आणीबाणीला विरोध करण्यासाठी मुंडे, महाजन औरंगाबादेत आले. ‘मराठवाडा’च्या शेजारील सन्मित्र कॉलनीत एक खोली भाड्याने घेऊन ते, प्रमोद महाजन व जयसिंगराव गायकवाड यांच्यासोबत राहू लागले. दिवसभर सायकलवर फिरून माहिती जमा करायची व रात्री त्या माहितीचे सायक्लोस्टाईल पत्रके तयार करून मोठमोठ्या अधिकार्‍यांच्या घरासमोर ती पत्रके ते गुपचूप टाकत. पोलिसांनी त्यांना अटक केली व हर्सूल जेलमध्ये टाकले.