शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

...अन् मध्यप्रदेशातील मांडलामध्ये जन्मानंतर तासाभरात ९० टक्के शिशूंना मिळू लागले आईचे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:44 IST

राष्ट्रीय आरोग्य मिशन, आरोग्य मंत्रालय आणि ‘डब्ल्यूएचओ’ने प्रकाशित केली केस स्टोरी

ठळक मुद्देबदल करण्यात घाटीतील परिचारिकेचा सहभागस्टेला रंगारे या मेंटाॅर म्हणून मध्य प्रदेशातील मांडला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जन्मानंतर तासाभरात नवजात शिशूला आईचे दूध मिळाले तर अनेक गोष्टींपासून शिशूचे संरक्षण होते. पण मध्यप्रदेशातील मांडला जिल्हा रुग्णालयात जन्मानंतर शिशूंना लगेच आईचे दूध पाजण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यासाठी रुग्णालयातील काही गोष्टी कारणीभूत होत्याच, सोबत रुढी-परंपरेमुळे जन्मानंतर आईचे दूध पाजण्याऐवजी मध दिले जात असे. परंतु यात सुधारणा झाली आणि येथे जन्मानंतर तासाभरात ९० टक्के शिशूंना आईचे दूध मिळू लागले. या सगळ्या सुधारणेत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील एका परिचारिकेचा सहभाग राहिला आहे.

स्टेला रंगारे असे या परिचारिकेचे नाव आहे. त्या घाटीतील नवजात शिशू व अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) येथे कार्यरत आहेत. २०१७ मध्ये नेशनवाईड क्वाॅलिटी ऑफ केअर नेटवर्कचे (एनक्यूओसीएन)सदस्य डाॅ. मेहताब सिंग, डाॅ. केदार सावळेश्वरकर यांनी नवजात शिशू विभागाला भेट देत विभागप्रमुख डाॅ. एल. एस. देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ‘एनआयसीयू’तील सेवेची गुणवत्ता वाढीवर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या कार्यशाळेत ‘एनक्यूओसीएन’चे डाॅ. विक्रम दत्ता यांनी डाॅक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण दिले. जवळपास ३० परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील १० परिचारिका या ट्रेनर्स झाल्या. यात स्टेला रंगारे यांचा समावेश होता.

स्टेला रंगारे या मेंटाॅर म्हणून मध्य प्रदेशातील मांडला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या. पथकात डाॅ. श्रीविस्ताव आणि इतर होते. मांडला जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. जन्मानंतर तासाभरात आईचे दूध न मिळण्याची कारणे जाणून घेतली. तेव्हा जन्मानंतर पायाचा शिक्का मारणे, टॅग लावणे, व्हिटॅमिनचे इंजेक्शन देणे, नातेवाईकांना दाखविणे, या सगळ्यात तासाभरानंतर शिशू आईजवळ येत. शिवाय रुढी-परंपरेमुळेही नातेवाईकही आधी शिशूला मध देत असत. यामुळे शिशूंमध्ये इन्फेक्शनचा दर अधिक होता.

अतिदक्षता विभागात दाखल होण्याचे प्रमाण घटलेअनेक दिवसांच्या प्रशिक्षण, प्रयत्नांनंतर यात बदल झाला आणि याठिकाणी जन्मानंतर ९० टक्के शिशूंना तासाभरातच दूध मिळू लागले. यामुळे जन्मानंतर नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले. यासंदर्भात ‘एनएचएम’,‘मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ॲण्ड वेल्फेअर गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया’ आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केस स्टोरी प्रकाशित केली आहे. मेट्रन विमल केदार, नवजात शिशू विभागप्रमुख डाॅ. एल. एस. देशमुख यांचे सहकार्य मिळाले, असे स्टेला रंगारे म्हणाल्या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी