शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संचिकेवर अधिकाऱ्यांचा नकारात्मक शेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:12 IST

महापौर नंदकुमार घोडेले यांनी लेखा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संचिका मागवली.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत वादंगसंचिका दाखविण्यास अधिकाऱ्यांचा नकार

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मनपाकडून उभारण्यात येणार आहे. स्मारकाच्या फाईलवर अधिकाऱ्यांनी नकारात्मक शेरा मारला आहे. त्यामुळे ही फाईल स्थायी समितीच्या सभागृहात आणून दाखवावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी आज केली. लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फाईल दाखविण्यास नकार दिला.

सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी ठाकरे स्मारकाच्या कामाची संचिका लेखा विभागात का प्रलंबित ठेवली आहे, नेमका कोणता शेरा मारून ही संचिका बाजूला केली आहे, असा प्रश्न केला. ही संचिका सभागृहात मागवून प्रशासनाकडून खुलासा घ्यावा, अशी मागणी जंजाळ यांनी सभापतींकडे केली. त्यावर खुलासा करताना लेखाधिकारी संजय पवार यांनी आयुक्तांकडून संचिका आपल्याकडे आली असून संचिका मंजूर करून पुढे पाठविल्याचे सांगितले. त्या संचिकेवर नेमका काय शेरा मारला आहे याविषयी सांगा, असा प्रश्न जंजाळ यांनी केला. ठाकरे स्मारकाचा भावनिक मुद्दा आहे, या कामात अशी दिरंगाई का केली जात आहे, ती संचिका सभागृहात आणून आम्हाला दाखवा, अशी मागणी जंजाळ यांनी केली. त्यावर पवार यांनी, सभा कामकाज नियमावली अनुसूचित-ड प्रमाणे विषयपत्रिकेत असलेल्या विषयांवर अधिकारी खुलासा करू शकतात. नियमाने विषयपत्रिकेवर नसलेल्या विषयासंबंधी आयुक्तांच्या परवानगीशिवाय मी खुलासा करू शकत नाही, संचिका दाखवू शकत नाही, असे सांगितले. संचिका येईपर्यंत बैठक तहकूब करावी, अशी मागणी जंजाळ यांनी केली. सभापती कुलकर्णी यांनी बैठक तहकूब केली. 

संचिकेत नेमके काय दडले आहे?लेखा विभागाने दाबून ठेवलेली संचिका ही ठाकरे स्मारकाच्या कामाची नाही, तर या स्मारकाच्या कामाचा डीपीआर तयार करणाऱ्या प्रकल्प सल्लागार कंपनीचे बिल अदा करण्याची आहे. अद्याप स्मारकाच्या कामाची निविदाही नाही. ४शासनाकडून निधीही मिळालेला नाही. त्याआधीच प्रकल्प सल्लागार कंपनीचे बिल काढण्याची संचिका लेखा विभागात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सेना नगरसेवक महापौर दालनातमहापौर नंदकुमार घोडेले यांनी लेखा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून संचिका मागवली. मात्र, लेखा विभागात संचिका नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर उपअभियंता परदेशी यांना विचारणा केली. तेव्हा संचिका लेखा विभागातच असल्याने त्यांनी सांगितले. नियमानुसार आयुक्तांना पत्र पाठवून संचिका मागविण्यात येईल, असे महापौरांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका