शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"हे घ्या पुरावे!"; कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटींचा भ्रष्टाचार, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:05 IST

'बोगस बँक गॅरंटी'तून सरकारला चुना; कृषी वाहिनी घोटाळ्यात नेत्यांचा सहभाग, दानवे आक्रमक

छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारच्या कृषी वाहिनी योजनेत १० हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. "भाजपने पुरावे मागितले होते, ते आज मी जाहीर करत आहे," असे म्हणत दानवे यांनी या प्रकरणातील बोगस बँक गॅरंटी आणि प्रशासकीय अनागोंदीवर बोट ठेवले.

बोगस बँक गॅरंटीतून सरकारची फसवणूकदानवे यांनी सांगितले की, या योजनेत सहभागी कंपन्यांनी बोगस बँक गॅरंटी सादर केली होती, ज्याची माहिती असूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. "टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असतानाही काम सुरू झाले नाही. उलट, बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनी स्वतःच्या नावावर करून फायनान्स उचलण्यात आला," असा दावा त्यांनी केला. या प्रकरणी राहुल पन्हाळे या अधिकाऱ्यासह इतरांवर तक्रारी असून आतापर्यंत चार अधिकारी निलंबित झाले आहेत. नांदेडमध्ये सुमारे तीन हजार एकर जमीन 'मेघा इंजिनियरिंग' कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संजय शिरसाट प्रकरणअविनाश जाधव यांनी केलेल्या आरोपात तथ्य वाटते. शिरसाट यांच्या खात्यातील अनियमिततेमुळेच मुख्यमंत्री त्यांच्या फाईल्स मंजूर करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सत्तेत असूनही शिंदे गटाला हातगाडी प्रश्नावर आंदोलन करावे लागते, याचा अर्थ प्रशासन त्यांचे ऐकत नाही, अशी टीका दानवे यांनी केली. अजित पवार यांचा विमान अपघात हा केवळ अपघात नसून घातपाताची शक्यता तपासली पाहिजे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Evidence Provided! Ambadas Danve Alleges ₹10,000 Crore Scam in Irrigation Scheme.

Web Summary : Ambadas Danve alleges a ₹10,000 crore scam in the state's irrigation scheme involving bogus bank guarantees. He accuses officials of negligence and companies of fraudulent land acquisition and financing. Suspensions occurred. He also questioned an incident involving Ajit Pawar.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेCorruptionभ्रष्टाचार