औरंगाबाद : अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आणि त्यांच्या कुटुंबियांनी शनिवारी औरंगाबाद दौऱ्यात शाकाहारी जेवणास प्राधान्य दिले. शहरातील एका हॉटेलमधून त्यांच्यासाठी खास जेवण बनविण्यात आले.भारतामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे निश्चित झाल्यानंतर दौºयात त्यांची काळजी घेण्यासाठी एक यंत्रणा असते. यंत्रणेमार्फ त स्थानिक प्रशासनाला आवश्यक पुर्ततेसाठी एक यादीच पाठविली जाते. त्यात सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा करणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा रक्तगट असलेल्या किमान दोन व्यक्ती अथवा दोन बाटल्या रक्त उपलब्ध करणे, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकाºयांचे पथक तैनात करणे आदी गोष्टींचा समावेश असतो. बेजोस यांच्या दौºयाची गोपनीयता बाळगून शनिवारी सर्व गोष्टींना प्राधान्य देण्यात आले.बेजोस यांच्या जेवणाची जबाबदारी शहरातील एका नामांकित हॉटेलवर सोपविण्यात आली होती. बेजोस यांनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. औरंगाबाद ते वेरूळ लेणी प्रवासात त्यांनी सँडविच सोबत घेतले होते. प्रवासात त्यांनी विमानातील पाण्याच्या बाटल्या सोबत घेतल्या होत्या. गोपनीयतेमुळे जेवणातील पदार्थ सांगता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अॅमेझॉनच्या संस्थापकांचा शाकाहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:45 IST