शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

अबब ! औरंगाबादकर दररोज रिचवतात २० लाख कप चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:01 IST

सध्या शहरात पावसाचा जोर नसला तरी ढगाळ वातावरण आणि दिवसभर राहणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे चहाची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे.

ठळक मुद्देआपली तलफ भागविण्यासाठी शहरवासीय दररोज २० लाख कप चहा रिचवत आहेत.  दररोज साधारणपणे अडीच टन चहापत्ती यासाठी वापरली जात असावी, असा अंदाज आहे.

 औरंगाबाद : ‘आओ हमारे होटल में, चाय पियोजी गरम गरम... बिस्कुट खालो नरम नरम... जो दिल चाहे  माँगलो हमसे, सबकुछ है भगवान कसम...’ या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुंदन’ या चित्रपटातील गीताची पावसाळ्याच्या दिवसांत आठवण न होणारा ज्येष्ठ विरळाच. सध्या शहरात पावसाचा जोर नसला तरी ढगाळ वातावरण आणि दिवसभर राहणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे चहाची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे. आपली तलफ भागविण्यासाठी शहरवासीय दररोज २० लाख कप चहा रिचवत आहेत.  

२० लाख कप चहा बनविण्याचा खर्चही तसाच आहे. दररोज साधारणपणे अडीच टन चहापत्ती यासाठी वापरली जात असावी, असा अंदाज आहे. या चहापत्तीची किंमत सुमारे ७ लाख रुपयांपर्यंत जाते. चहा कमी अधिक गोड असला तरी तो बनविण्यासाठी साखर लागतेच. दररोज ४० लाख रुपयांची सुमारे १२०० क्विंटल साखर यासाठी खर्ची पडते. दुधाशिवाय चहा पिणारेही आता वाढले आहेत. तरीही शहरवासीयांना चहासाठी दररोज २ लाख लिटर दूध लागते. याचा खर्च सुमारे ८० लाख रुपये आहे. चहाची तलफ भागविण्यासाठी सर्व खर्च मिळून औरंगाबादकर तब्बल १ कोटी २७ लाख रुपयांचा खर्च करीत आहेत. पाणी मिसळून तीन ते साडेतीन लाख कप चहा व कॉपी बरे या चहाचा दरही कुठे ५ रुपये, कुठे ६ रुपये, कुठे ८ रुपये तर काही ठिकाणी १० रुपये कप (किंवा कट) असा अगदी स्वस्त असा आहे. काही कॅफेमध्ये मात्र ८० रुपयांपर्यंत चहा, कॉफी विकली जाते.  

आसामच्या चहापत्तीला अधिक पसंती आसाम व दक्षिण भारतातून चहापत्ती येते, पण आसाममधील चहापत्ती शहरात अधिक पसंत केली जाते. चहा विक्रेते रमेश रुणवाल यांनी सांगितले की, सध्या चहापत्तीची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे. खप वाढला आहे. शहरात  ६० टक्के ब्रँडेड व ४० टक्के सुटी चहापत्ती विकली जाते. २८० ते ३०० रुपये किलोदरम्यानची चहापत्ती जास्त प्रमाणात विकते. साखरेचे व्यापारी नीलेश सेठी म्हणाले की, शहरात दररोज सुमारे १२०० क्विंटल साखर विकली जाते.

आठ लाख लोक चहा पितातमहानंदाचे व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी सांगितले की, शहरात सर्व कंपन्यांचा मिळून २ लाख लिटरपर्यंत दुधाची दररोज विक्री होते. ४० रुपये प्रतिलिटरने ८० लाख रुपयांचे दूध विकल्या जाते. चहा विक्रेते विजय कल्याणकर यांनी सांगितले की, दररोज शहरात २० लाख कपपेक्षा अधिक चहा तयार होतो. ८ ते १० लाख लोक ही चहा पितात. कोणी दोनदा तर कोणी तीनदा चहा पितात. दिवसभरात ५ ते ८ कप चहा पिणारेही काही महाभाग आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार