शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

स्वत:ला नेहमी अपडेट ठेवा

By admin | Updated: July 20, 2014 00:28 IST

नांदेड : आजचे जग हे ग्लोबलायजिंग झाले असून बदलत्या काळानुसार परिवर्तन होणे गरजेचे असते़ यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी नेहमी अपडेट होत राहणे गरजेचे आहे

नांदेड : आजचे जग हे ग्लोबलायजिंग झाले असून बदलत्या काळानुसार परिवर्तन होणे गरजेचे असते़ यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी नेहमी अपडेट होत राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले़ मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर ३२ कक्षाच्या वतीने डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मराठा समाजातील प्रज्ञा प्रतिभावंतांचा शनिवारी गौरव करण्यात आला़ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अ‍ॅड़ खेडेकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार तर वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा व्याख्याते प्रदीप सोळुंके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कृषी अधीक्षक एस़ जी़ पडवळ, अधिष्ठाता प्रा़ डॉ़ वैजयंता पाटील, परभणी येथील कर सल्लागार रेणुका इंगळे, गणेश मोरे, केंद्रीय सचिव मधुकरराव मेहकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, विक्रीकर अधिकारी आनंद कलूरकर, गोविंद शिंदे, सरस्वती धोपटे, बालासाहेब इंगोले, मधुकरराव देशमुख, चंद्रभान पाटील जवळेकर, अंकुशराव मोरे, मनकर्णाताई ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती़ अ‍ॅड़ खेडेकर म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊ, सईबाई, येशुबाई, अहिल्याबाई आदी महिलांचे कार्य पाहिले तर मराठ्यांचा इतिहास हा महिलांचा इतिहास असल्याचे लक्षात येते़ त्या काळातील महिलांचा आजच्या महिलांनी आदर्श घेवून आजच्या स्त्रियांनी दैव, कर्मकांड, अंधश्रद्धा आदी गोष्टींना थारा देवू नये, असे आवाहन अ‍ॅड़ पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले़ इंग्रजीच्या काही शब्दांनी जग व्यापून टाकले आहे़ माणूस बहुभाषिक असल्यास त्यास नक्की फायदा मिळतो़ गुजराती माणूस मराठी शिकू शकतो तर आपण इतर भाषा का शिकायला नको? मराठी ही आपली मातृभाषा आहे, परंतु इंग्रजी, हिंदी इतर भाषाही मातृभाषा आहेत, असे समजून त्या शिकल्या पाहिजे, असे ते म्हणाले़ जगात, देशात, घरात काय चाललेले आहे, यावर लक्ष ठेवून त्यावर चिकित्सा करायला शिका़ जग हे गतिमान असून त्याप्रमाणे आपल्याला गती घेता आली पाहिजे, असेही ते म्हणाले़ कमावलेला पैसा पुढच्या पिढीसाठी संचित करणे योग्य नसून त्याचा उपयोग करा़ तुमचा मुलगा हा तुमची संपत्ती आहे, त्याच्या शिक्षणावर पैसा खर्च करा म्हणजे आपोआपच तो उद्या देशाची संपत्ती होईल, असे त्यांनी सांगितले़ मराठा सेवा संघाची खरी ओळख नांदेड जिल्ह्यातून झाल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान, स्पर्धा परीक्षेतील यशवंत, पीएच़ डी़, एम़ फिल़ प्राप्त विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर वर्गात विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, बारावी, दहावी तसेच शालेय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, फूल आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ प्रास्ताविक प्रा़डॉग़णेश शिंदे यांनी केले़ कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष एकनाथराव पावडे, श्यामसुंदर शिंदे, गणेश भायेगावकर, भागवत देवसरकर, सविताताई पावडे, पंडीत पवळे, इंजि़ शे़ रा़ पाटील, दशरथ कदम, बळवंत मुळे, शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी हंबर्डे, महानराध्यक्ष संकेत पाटील, बाळासाहेब देसाई, विठ्ठल पावडे, प्रा़राधाकृष्ण होगे, पंडितराव कदम, इंजि़शिवाजीराजे पाटील, स्वनिल जाधव, उद्धव सूर्यवंशी, विवेक मोरे, सोपानराव पांडे, इंजि़एम़ डी़ नरवाडे, डॉ़सोपानराव क्षीरसागर, प्रल्हादराव दुरपडे, शिवहरी गाढे, प्रा़महेश मोरे, गजानन लोमटे, अ‍ॅड़दिगंबर देशमुख, दिपक सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन राजश्री शिंदे- मिरजकर व प्रा़ संतोष देवराये यांनी केले़ (प्रतिनिधी)आरक्षणामुळे ६०० कोटी वाचणाऱ़़मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचे ६०० कोटी रूपये वाचणार असून शासनाला ६०० कोटी रूपयांची तरतूद करावी लागणार आहे, असे मत व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी व्यक्त केले़ आरक्षणामुळे नक्की परिवर्तन होईल़ समाजातील सुजाण नागरिकांनी रविवार हा मटन डे म्हणून साजरा न करता मिशन डे म्हणून साजरा करावा़ समाजासाठी एक दिवस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले़ तसेच विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होवू नये, अशी वागणूक देवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पालकांनी करावे, असे आवाहन प्रदीप सोळुंके यांनी केले़