शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेयसीने लग्नासाठी धरला हट्ट; संतापून प्रियकराने केला चाकूने हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:16 IST

प्रियकराच्या नादात महिला पतीचे घर सोडून वाळूज परिसरात प्रियकरासोबत राहत होती.

ठळक मुद्दे लग्नासाठी हट्ट धरणाऱ्या प्रेयसीवर चाकूहल्लाजोगेश्वरीतील हल्ल्यानंतर प्रियकर फरार

वाळूज महानगर : लग्नासाठी हट्ट धरणाऱ्या विवाहित प्रेयसीवर तिच्या प्रियकराने चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी जोगेश्वरीत घडली. या चाकूहल्ल्यात प्रेयसी किरकोळ जखमी झाली असून, हल्लेखोर प्रियकर फरार झाला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, संगीता (२३, नाव बदलले आहे) हिचे लग्न झालेले असून, तिला दोन मुले आहेत. लग्नानंतर संगीताची साडेतीन वर्षांपूर्वी दशरथ निकम (२३, रा. जोगेश्वरी) याच्याशी मैत्री होऊन नंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रियकराच्या नादात संगीता पतीचे घर सोडून वाळूज परिसरात दशरथ याच्यासोबत राहत होती. दशरथ हा उद्योगनगरीतील एका बीअरच्या कंपनीत काम करतो. गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास संगीता ही दशरथला भेटण्यासाठी जोगेश्वरीला गेली होती.

दशरथची भेट झाल्यानंतर संगीताने त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला. यावेळी दशरथने संगीताला ‘तुला दोन मुले असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही’ असे सांगितले, तसेच आपण दुसरीकडे लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले. प्रियकर लग्न करण्यास तयार नसल्यामुळे संगीताचा दशरथसोबत वाद झाला. या वादावादीनंतर संतप्त झालेल्या दशरथने संगीताला शिवीगाळ करून चाकू काढून तिच्या डाव्या हातावर व डोक्यावर वार केले. 

संगीताला दशरथ मारहाण करीत असल्यामुळे शेजारील नागरिक, तसेच दशरथच्या आईने मध्यस्थी करून दशरथच्या तावडीतून संगीताची सुटका केली. चाकूहल्ला केल्यानंतर दशरथ हा घटनास्थळावरून पसार झाला. या चाकूहल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या संगीताने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून प्रियकर दशरथ निकम याच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. कारभारी देवरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादWalujवाळूज