शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भारीच! दागिन्यांच्या हौसेसोबत सोने-चांदी खरेदीदारांना वर्षभरात २५ टक्के फायदा

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 30, 2024 17:40 IST

ऑक्टोबर महिन्यात मिळाला मागील ५० वर्षातील विक्रमी भाव

छत्रपती संभाजीनगर : प्रत्यक्षात सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांना मागील वर्षात २५ टक्के नफा मिळाला आहे. मागील ५० वर्षांतील भाववाढीचा विक्रम यंदा ऑक्टोबर महिन्यात नोंदविण्यात आला. महिलांची सोन्याच्या दागिन्याची हौसही झाली आणि भाववाढीचा फायदाही मिळाला.

वर्षभरात कसे वाढले भावमहिना सोने (१० ग्रॅम) चांदी (प्रति किलो)१ जानेवारी ६३३५३ रुपये--- ७३७०५ रुपये१ फेब्रुवारी ६२५९९ रुपये---७०८३४ रुपये१ मार्च ६२८१६ रुपये--- ६९८९८ रुपये१ एप्रिल ६८६६३ रुपये--- ७५१११ रुपये२ मे ७१३२७ रुपये---७९७१९ रुपये३ जून ७१७७६ रुपये---९०२१७ रुपये१ जुुलै ७१६२६ रुपये---८७८०२ रुपये१ ऑगस्ट ६९७२१ रुपये---८३४६४ रुपये२ सप्टेंबर ७१५११ रुपये---८२७८० रुपये१ ऑक्टोबर ७५५१५ रुपये---८९८८२ रुपये१ नोव्हेंबर ७८९०० रुपये---९५००० रुपये२ डिसेंबर ७६३०८ रुपये---८८६११ रुपये२८ डिसेंबर ७८५०० रुपये---९१००० रुपये

३० ऑक्टोबर ठरला विक्रमी दिवससोने व चांदीच्या भाववाढीत ३० ऑक्टोबर २०२४ या दिवशी विक्रम नोंदविण्यात आला. त्या दिवशी सोने ७९५८१ रुपये तर चांदी ९८००० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. मागील ५० वर्षांतील सर्वात उच्चांक ठरला. त्यानंतर शेवटच्या दोन महिन्यात सोन्याच्या किमतीत १०८१ रुपयांची घट झाली तर चांदीच्या किमतीत ७००० रुपयांची घसरण झाली.

ऑक्टोबरमध्ये का झाली मोठी भाववाढसोने-चांदीच्या भाववाढीला अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे, रशिया व युक्रेन युद्ध तसेच इस्त्रायल-हमास व लेबनाॅनशी युद्ध आणखी भडकले होते. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत होता आणि त्या काळात भारतात सणासुदीचे दिवस होते. त्यात ऑक्टोबर महिन्यात भारतासह पोलंड, तुर्की, इंडोनेशिया आदी देशांनी सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले. याचा परिपाक म्हणजे सोने-चांदीला विक्रमी किंमत प्राप्त झाली.

वर्षभरात वाढलेवर्षभरात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅमला १५१४७ रुपये व चांदी प्रति किलोमागे १७२९५ रुपयांनी महागली. ज्यांनी जानेवारी २०२४ या महिन्यात सोने व चांदी खरेदी केले त्यांना डिसेंबरपर्यंत २५ टक्के नफा झाला.

नवीन वर्षात सोने ८५ हजारापर्यंत जाईलआंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध आणखी भडकले, तर सोन्याचे भाव नवीन वर्षात ८५ हजार रुपयांपर्यंत तर चांदी १ लाख १५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.- नंदकुमार जालनावाला, सराफा व्यापारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरGoldसोनंMarketबाजार