शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

कोट्यवधी रुपयांचे अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:11 AM

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर मातांना औरंगाबाद जिल्हा वगळता उर्वरित राज्यांत अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी कोट्यवधी रुपयांचे वाटप झाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना या जिल्ह्यात १८ डिसेंबरपासून अमलात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघ्या दहाच दिवसांत जिल्ह्यातील तब्बल २२०० गरोदर मातांनी नोंदणी केलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर मातांना औरंगाबाद जिल्हा वगळता उर्वरित राज्यांत अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी कोट्यवधी रुपयांचे वाटप झाले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना या जिल्ह्यात १८ डिसेंबरपासून अमलात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघ्या दहाच दिवसांत जिल्ह्यातील तब्बल २२०० गरोदर मातांनी नोंदणी केलेली आहे.या योजनेसाठी जात, धर्म, उत्पन्न किंवा दारिद्र्यरेषेखालील अशी कोणतेही अट नाही. ग्रामीण-शहर ही देखील अट नाही. जी महिला पहिल्यांदा गरोदर असेल, त्या महिलेला पोषक आहार मिळावा, हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये एकूण ५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. यासाठी गरोदरपणाच्या पहिल्या १५० दिवसांच्या आत पहिली नोंदणी करणे अनिवार्य आहे. पहिल्या नोंदणीच्या वेळी एक हजार रुपये, गरोदरपणाच्या पहिल्या तपासणीला अर्थात १८० दिवसांपर्यंत २ हजार रुपयांचे अनुदान आणि प्रसूती झाल्यानंतर जन्माला आलेल्या बाळाची नोंदणी व बाळाचे लसीकरण झाल्यास २ हजार रुपये, असे एकूण ५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरोदर महिलांसाठी हितकारक आहे. शहरांमध्ये महिलांना बरोबरीने वागविले जाते; परंतु ग्रामीण भागात आजही महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. गरोदरपणामध्ये महिलांना सकस व पोषक आहार न मिळाल्यास माता व जन्माला येणाºया बाळाची प्रकृती अनेकदा उत्तम नसते. कुपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाण अधिक असते. कधी-कधी प्रसूतीच्या वेळी माता किंवा बाळाचा मृत्यूही होतो. ही बाब लक्षात घेता शासनाने याच महिन्यात प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना अमलात आणली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलांचे स्वत:चे बँकेत खाते असावे. स्वत:चे आधार कार्ड असावे, गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्तीच्या माध्यमातून ‘आरसीएच पोर्टल’वर १५० दिवसांच्या आत नोंदणी करावी. नोंदणी करताना सदरील आशा किंवा अंगणवाडी कार्यकर्ती ही ‘आरसीएच पोर्टलवर’ नोंदणीकृत झालेली असावी.यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, अतिशय महत्त्वाकांक्षी ही योजना आहे. या योजनेला जात-धर्म अथवा उत्पन्नाची अट नाही. या महिन्यातच योजना अमलात आली. अवघ्या दहाच दिवसांत २६०४ गरोदर महिलांनी नोंदणी केली. यापैकी ज्यांच्याकडे बँक खाते नाही, आधार कार्ड नाही किंवा बँक खात्याला आधारकार्ड लिंक नाही, अशा गरोदर मातांचे अर्ज रद्द झाले आहेत.