शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील सर्व क्वारंटाईन सेंटर बंद; यापुढे अँटिजन टेस्टवर राहणार सर्वाधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:14 IST

क्वारंटाईन केंद्रे चालविण्यासाठी दररोज महापालिकेला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावे लागत होते. 

ठळक मुद्देमहापालिकेने उभारली होती ३२ केंद्रेरुग्ण नसल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी शहरात तब्बल ३२ ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारले होते. अत्याधुनिक अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आल्यानंतर हळूहळू क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांची संख्याही घटत होती. गुरुवारी रात्रीपासून शहरातील सर्व सेंटर्स बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. क्वारंटाईन करण्यासाठी रुग्णच नसल्याचे प्रशासक  आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाण्डेय यांनी नमूद केले की, रुग्ण नसल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या चिकलठाणा येथील कोविड केअर सेंटरमध्ये बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. याठिकाणी आॅक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सीएसआर फंडातून अत्याधुनिक सिटीस्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. एमजीएम, एमआयटी आणि किलेअर्क येथील सीसीसी अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. 

मार्च महिन्यात शहरात कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार शहरात २ हजार नागरिक राहू शकतील एवढ्या क्षमतेचे ३२ क्वारंटाईन सेंटर तयार केले. प्रत्येक सेंटरवर शंभर ते दीडशे संशयित रुग्णांना तीन ते चार दिवस थांबविण्यात येत होते. कोरोना टेस्टसाठी थांबविण्यात आलेल्या नागरिकांना दोन वेळा जेवण, चहा, नाश्ता आदी सोयीसुविधा महापालिकेला द्याव्या लागत होत्या. क्वारंटाईन केंद्रे चालविण्यासाठी दररोज महापालिकेला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावे लागत होते. 

औरंगाबादेत रुग्णसंख्या कमी; पण...राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबाद शहरात रुग्णसंख्या कमी आहे. आतापर्यंत २३ हजार रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्येचा विस्फोट कधीही होऊ शकतो. नागरिकांनी आपल्या जबाबदारीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, असेही पाण्डेय यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद