शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व ‘कन्फ्युजन’ झाले दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:17 IST

लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळालेल्या विविध प्रकारच्या माहितीमुळे सर्व प्रकारचे कन्फ्युजन दूर झाले असल्याची प्रतिक्रिया फेअरमधून बाहेर पडताना पालकांसह विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : करिअर निवडण्यासाठी कन्फ्युजन होते. हे निवडावे की ते... असा प्रश्न मनात घोळत होता. मात्र, लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळालेल्या विविध प्रकारच्या माहितीमुळे सर्व प्रकारचे कन्फ्युजन दूर झाले असल्याची प्रतिक्रिया फेअरमधून बाहेर पडताना पालकांसह विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. या फेअरचा रविवारी (दि.२७) सायंकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात समारोप झाला.करिअरच्या अनेक वाटा दाखवून विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यात मोला वाटा उचलणाऱ्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचा उत्साहात समारोप झाला. शुक्रवारी सकाळी सुरू झाल्यापासून रविवारी सायंकाळी ९ वाजता समारोप होईपर्यंत हजारो पालक, विद्यार्थ्यांनी फेअरला भेट देऊन आपल्या करिअरची निवड केली. उच्च दर्जाचे शिक्षण देणारी महाविद्यालये, अभ्यासक्रम याची माहिती अत्यंत कमी वेळेत आणि विनामूल्य मिळाली. या फेअरमध्ये भेट देऊन बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेह-यावर समाधानाच्या छटा दिसून येत होत्या.प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांची विशेष गर्दी दिसून आली. करिअर घडविण्यात मैलाचा दगड ठरणा-या या फेअरला भेट देण्याची संधी चुकूनही हुकवायची नाही, असा जणू शहरातील विद्यार्थ्यांनी निश्चयच केला होता.केवळ शहरातील नव्हे तर आसपासच्या गावांतीलही अनेक विद्यार्थी खास लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरसाठी शहरात आले असल्याचे दिसून आले. फेअरच्या आयोजनामागील हेतू शंभर टक्के यशस्वी झाला. मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, इंटेरिअर डिझायनिंग, रिटेल, व्यवसाय, आयटीआय, फार्मसी, अ‍ॅनिमेशन, अ‍ॅग्री, मीडिया, अशा शेकडो अभ्यासक्रमांची माहिती लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळाली.निकालाच्या अगोदर माहिती मिळाल्याचा फायदादहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. या निकालाच्या अगोदरच सर्व अभ्यासक्रमांची माहिती लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळाली. याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी, पालकांनी बोलताना दिली.बौद्धिक चाचणीलाही उदंड प्रतिसादशालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअरसंबंधी बौद्धिक चाचणी तीन दिवस सकाळी ११ वा. आणि सायंकाळी ६ वाजता घेण्यात आली. या चाचणीलाही विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चाचणीनंतर विद्यार्थ्यांना ‘करिअर ग्यान’ हे पुस्तक भेट देण्यात आले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटEducation Sectorशिक्षण क्षेत्र