शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

तीर्थक्षेत्र तुळजापुरातील सर्वच अनुदान रकमेची चौैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:18 IST

तुळजापूर :अनुदान रकमेची चौकशी करावी, घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

तुळजापूर : नगर परिषदेच्या यात्रा अनुदानात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल यांनी गैरव्यवहार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा वाट्टेल तसा उधळण्याला पायबंद घालण्यासाठी विद्यमान नगराध्यक्षांना पदच्युत करून आतापर्यंत मिळालेल्या सर्व अनुदान रकमेची चौकशी करावी, घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील पालिकेला शासनाकडून आलेल्या सन २०११-१२ मधील यात्रा अनुदान रकमेत अपहार झाल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांच्या वतीने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात सन २०११-१२ ते २०१५-१६ मधील यात्रा अनुदानाची चौकशी करण्यात यावी, आयएचएसडीपी घरकुल, १ कोटी ९ लाख रुपयांचे पेट्रोल, पाणीपुरवठा साहित्य खरेदी, सुनील प्लाझा बीओटी प्रकरण, अंदाजे ५१ कोटी रुपये लेखा परीक्षण अहवालानुसार झालेला अपहार, मोकाट जनावरे पकडण्यासाठी केलेल्या १३ लाख ६५ हजार रुपये खर्च यासह वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत इ. मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जि.प.सदस्य धीरज पाटील, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, माजी नगरसेवक नागनाथ भांजी, शिवसेना शहराध्यक्ष सुधीर कदम, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, नगरसेवक अमर मगर, सचिन पाटील, सुनील रोचकरी, अपर्णा नाईक, आरती इंगळे, शारदा भोसले, भारत कदम, विपीन शिंदे, गुलचंद व्यवहारे, अमोल कुतवळ, आनंद जगताप, अजय साळुंके, रणजित इंगळे, आनंद क्षीरसागर, माऊली भोसले, इंद्रजित साळुंके, बापूसाहेब नाईकवाडी, प्रतीक रोचकरी, लखन पेंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर प्रकरणी कठोर कारवाई न केल्यास आंदोलन व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला.