शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व खत आणि बियाणे विक्री दुकानांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 20:03 IST

कृषिमंत्री भुसे यांनी रविवारी जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्सवर छापा मारून खतांच्या साठेबाजीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जिल्हा कृषी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

ठळक मुद्देतक्रारीनंतर निर्णय का नाही जिल्हा कृषी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात

- विकास राऊत

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खत मिळत नसल्याबाबत तक्रार करूनही यंत्रणेने लक्ष न दिल्यामुळे स्वत: कृषिमंत्री दादा भुसे यांना छापा टाकावा लागल्याने राज्य कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी जिल्ह्यासह राज्यातील सर्व रासायनिक खते, बियाणे विक्रीच्या दुकानांतील साठा आणि वस्तुस्थिती तपासण्याची विशेष मोहीम कृषी विभागाने राबविण्याचे आदेश सोमवारी जारी केले आहेत. 

कृषिमंत्री भुसे यांनी रविवारी जाधववाडीतील नवभारत फर्टिलायझर्सवर छापा मारून खतांच्या साठेबाजीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जिल्हा कृषी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. त्या खत विक्रीच्या दुकानात स्टॉक रजिस्टर, ई-पॉस मशीन कृषिमंत्र्यांनी छापा मारल्यावर निदर्शनास आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे असाच प्रकार सुरू आहे की, काय अशी शंका उपस्थित होत आहे. 

दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृषी अधिकारी मोटे, गंजेवार यांना बोलावून घेतले होते. खतांच्या साठेबाजीचे प्रकरण नेमके काय आहे, हे जाणून घेतले. जे काही घडले त्याबाबत कृषी आयुक्तालय याबाबत चौकशी करील; परंतु जिल्ह्यात कुठेही जास्तीच्या दराने खत विक्री होणार नाही, लिकिंग होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यात पुन्हा आढावा घेण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीदेखील याप्रकरणी आढावा घेतला आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात सहा ते सात मोठे खतांचे वितरक आहेत. त्यांच्याकडून खतांचे वितरण कसे झाले आहे, याबाबतची माहिती विशेष मोहिमेत समोर येणे शक्य आहे. यंत्रणेवर वचक  म्हणून उलटतपासणी झालीच पाहिजे; परंतु यंत्रणेचे मनोबल खच्ची करू नये, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कृषी आयुक्तांची माहिती अशी : कृषी आयुक्त दिवसे यांनी सांगितले, नियमित तपासणी सुरूच असते; परंतु पुन्हा विशेष तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. मुळात वितरणातील काही त्रुटी आहेत. पुरेसा साठा आहे; परंतु दुकानदारांपर्यंत साठा पोहोचत नाही. १० पैकी २ दुकानांत साठा जात नाही. औरंगाबादच्या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे.

जिल्ह्याची खतांची मागणी अशी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत युरिया, डीएपी, एसएसपी, टीएसपी, एमओपी, एकूण संयुक्त खते  मिळून ३ लाख १९ हजार २०० मेट्रिक टन खतांच्या मागणीपैकी २ लाख ३३ हजार ९१० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले. खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री देसाई यांच्याकडे लिंकिंंग, जास्त दराने खत विक्री, खताबरोबर इतर माल घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दीड महिन्याने कारवाई झाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद