शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसंगावधान ; धावत्या रेल्वेत चढताना पडलेल्या वृद्धेचे पोलिसाच्या सतर्कतेने वाचले प्राण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:25 IST

रेल्वे निघत असताना घाईघाईत डब्ब्यात चढताना पाय घसरून पडलेल्या एका वृद्ध महिला प्रवास्याचे प्राण तेथे उपस्थित असलेल्या पोलिसाच्या सतर्कतेने वाचले.

औरंगाबाद : रेल्वे निघत असताना घाईघाईत डब्ब्यात चढताना पाय घसरून पडलेल्या एका वृद्ध महिला प्रवाश्याचे प्राण तेथे उपस्थित असलेल्या पोलिसाच्या सतर्कतेने वाचले. ही घटना बुधवारी दुपारी १.४० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी १.४० वाजेच्या दरम्यान सचखंड एक्प्रेस (रेल्वे क्रमांक १२७१५ ) उभी होती. रेल्वे नियोजित वेळेस स्थानकावरून निघत असताना शबाना खान या ५२ वर्षीय प्रवासी महिलेने रेल्वेत चढण्याच्या प्रयत्न केला. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून निघाली असल्याने त्यांना मध्ये चढता आले नाही आणि त्या पाय घसरून प्लॅटफॉर्मवर पडल्या, यातच त्यांचा हात रेल्वे व प्लॅटफॉर्ममध्ये जाण्याची शक्यता होती. हे दृश्य तेथे  कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस विजय वाघ यांच्या निदर्शनास आले, त्यांनी तात्काळ शबाना यांच्याकडे धाव घेत त्यांना तेथून बाजूला केले आणि त्यांचे प्राण वाचवले. याबद्दल शबाना यांनी वाघ यांचे आभार मानले तर सर्व प्रवाश्यांनी त्यांचे स्वागत केले.  

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनPoliceपोलिसRailway Passengerरेल्वे प्रवासी