शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारांना उडवले, एकाची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 15:43 IST

दारूच्या नशेत तर्रर असलेल्या कारचालक वकिलाने दुचाकीस्वारांना उडवले. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देमागून सुसाट आलेला कारचालक हनुमान चौकातच पुंडलिकनगरकडे वळण घेत असताना दुचाकीस्वारांना त्यांनी कारची धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की, दुचाकीस्वार दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

औरंगाबाद:  दारूच्या नशेत तर्रर असलेल्या कारचालक वकिलाने दुचाकीस्वारांना उडवले. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. हा अपघात गुरूवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर रोडवरील हनुमानचौकात घडला.

राजू लक्ष्मण बल्लाळ  (५५,रा.मुकुंदनगर, मुकुंदवाडी) आणि प्रतिक एकनाथ संकपाळ (१९,रा. हनुमानगर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सिडको एन-३ मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिली. ते म्हणाले की, राजू आणि प्रतिक हे एका दुचाकीने सिडको एन-३ कडून हनुमाननगर चौकाकडे जात होते. याचवेळी मागून सुसाट आलेला कारचालक हनुमान चौकातच पुंडलिकनगरकडे वळण घेत असताना दुचाकीस्वारांना त्यांनी कारची धडक दिली. 

हा अपघात एवढा भिषण होता की, दुचाकीस्वार दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ  जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी राजू बल्लाळ यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने ते कोमात आहे. तर प्रतिक हे शुद्धीवर असून त्यांचा जबाब पोलीस नोंदवून याप्रकरणी गुन्हा नोंदविला जाईल.  रात्री पोलिसांनी कारचालक अ‍ॅड. ज्ञानेश्वर माणिकराव वाघ आणि त्यांच्यासोबतच्या एकाला  ताब्यात घेतले तेव्हा ते मद्याच्या नशेत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात नेऊन तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीतही त्यांनी मद्य प्राशन केल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे पो.नि.मुदीराज म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी