शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतून आलेले अक्षता कलश मराठवाडा, खान्देशातील १५ जिल्ह्यांत रवाना

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 5, 2023 15:40 IST

अयोध्येत येण्यासाठी संत-महंतांना आग्रहाचे आमंत्रण

छत्रपती संभाजीनगर : २२ जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी मराठवाडा व खान्देशातील (देवगिरी प्रांत) १५ जिल्ह्यांसाठी रविवारी शहरातून १५ अक्षता मंगल कलश रवाना झाले. १ ते १५ जानेवारीदरम्यान या अक्षता १५ लाख घरांत निमंत्रणासह पोहोचविण्यात येणार आहेत. तत्पूर्वी या अक्षता कलशांचे समरसता यज्ञ करून पूजन करण्यात आले.

किराडपुरा येथील श्रीराम मंदिरातील बालाजी मंदिरात अयोध्येहून आलेले १५ अक्षता कलश ठेवण्यात आले होते. हिंदू धर्मातील विविध संप्रदायांतील प्रतिनिधिक स्वरूपात एकेका दाम्पत्यास यज्ञाला बसविण्यात आले. अक्षता कलशांचे विधिवत पूजन करण्यात आले. नंतर महिलांनी हे अक्षता कलश डोक्यावर घेऊन श्रीराम मंदिरात आणले. तेथे साधू-संतांनीही कलशांचे पूजन केले. यानंतर १५ जिल्ह्यांतील आलेल्या कार्यकर्त्यांकडे कलश सोपविण्यात आले. तसेच श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरीजी महाराज यांच्याकडेही एक अक्षता कलश सोपविण्यात आला. यानंतर अयोध्येत भगवंतांच्या मूर्ती स्थापनेच्या सोहळ्याला हजर राहण्याचे आमंत्रण संत-महंतांना देण्यात आले.

अयोध्येसाठी देवगिरी प्रांताचे ५० कोटींचे योगदानविहिंपचे देवगिरी प्रांत अध्यक्ष संजय बारगजे यांनी सांगितले की, मराठवाडा व खान्देश मिळून देवगिरी प्रांत आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारण्यासाठी या प्रांतातील भाविकांनी सुमारे ५० कोटींचे योगदान दिले. या प्रांतातील २० हजार मंदिरांत २२ जानेवारीला मोठा महोत्सव साजरा होईल.

१३ कोटी जप करणाऱ्या भाविकांचा सत्कारमागील २५ वर्षांत १३ कोटी ‘श्रीराम नाम जप’ करणारे ८५ वर्षीय शिवसिंग बहुरे यांचा विशेष सत्कार संत-महंतांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्या