शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'तंटामुक्ती'च्या निवडीवरून अजिंठ्याच्या सरपंचाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 14:19 IST

अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात घडली.

ठळक मुद्देसिल्लोड पंचायत समितीतील घटना परस्परविरोधी तक्रार दाखल  पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात

सिल्लोड (औरंगाबाद ) : अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तक्रार मागे घे म्हणून मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून सरपंच, पंचायत समिती सदस्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबूलाल झलवार, असे सरपंचांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे, तर झलवार यांच्या तक्रारीवरून अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार, तंटा मुक्त समिती अध्यक्ष अब्दुल अजीज, पं.स. सदस्य अलीबिन तमिमी चाऊस, महंमदखान पठाण यांच्याविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, अजिंठ्याच्या तंटामुक्त अध्यक्षपदी अब्दुल अजीज अल्कसेरी यांची गत महिन्यात निवड झाली होती. ती निवड बेकायदा झाली आहे. त्यात आवश्यक अधिकारी व लोकांना न बोलविता निवड झाली असून, ही निवड रद्द करावी, अशी तक्रार अजिंठा येथील बाबूलाल देवचंद झलवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. यावर बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली.

सकाळी ११.३० च्या दरम्यान, सहायक गटशिक्षणाधिकारी राठोड, विस्तार अधिकारी पी.बी. दौड सुनावणीस हजर झाले. यावेळी ग्रामसेवक हजर नसल्याने अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई बंडू पवार पाणी पिण्यासाठी बीडीओ यांच्या समोरील दालनात गेल्या असता तेथे बाबूलाल झलवार यांनी सरपंच दुर्गाबाई यांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली, तसेच विनयभंग केला, अशी तक्रार पवार यांनी दिली. यावरून झलवारविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यासोबतच अजिंठ्याचे तंटामुक्तगाव समिती अध्यक्ष अब्दुल अजीज यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे, असे म्हणून सरपंच दुर्गाबाई पवार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अब्दुल अजीज, पं.स. सदस्य अलीबिन तमिमी चाऊस, महंमदखान पठाण यांनी बेदम मारहाण केली, तसेच सोन्याची अंगठी, रोख १० हजार रूपये हिसकावून घेतले, अशी तक्रार झलवार यांनी केली. यावरून चौघाजणांविरुद्ध ४९४, ३४ आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, फौजदार कुटुंबरे हे करीत आहेत.

अखेर दोन्ही गटांविरूद्ध गुन्हा दाखलबुधवारी सकाळी ११.३० वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला. मात्र, सरपंच या काँग्रेसच्या आहेत, तर बाबूलाल झलवार हे भाजप गटाचे असल्याने दिवसभर गुन्हा दाखल करावा किंवा करू नये, यावरून वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर दबाव येत होता; पण पोलिसांनी कुणाच्याही दबावाची चिंता न करता दोन्ही गटांविरुद्ध अखेर बुधवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले.

चौघे ताब्यात च्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी अजिंठ्याचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अब्दुल अजीज अल्कसेरी, पंचायत समिती सदस्य अलीबिन तमिमी चाऊस, महंमदखान पठाण, बाबूलाल देवचंद झलवार यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या चौघांची वैद्यकीय तपासणी सुरू होती, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत