शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:25 IST

१३९ एकर जमिनीच्या संपादनासाठी ३२.३० कोटींचा निधी देण्यात आला आहे 

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी सोमवारी शासन निर्णयाद्वारे ६८.२५ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. यात चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक १३९ एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी ३२.३० कोटींचा निधी देण्यात आला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळलेला भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी शासनाने ४५५ कोटींची तरतूद केली आहे. त्यातील ६८.२५ कोटी रुपये सोमवारी (दि.२६) अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित केले. त्यात चिकलठाणा विमानतळासाठी ३२.३० कोटी, गोंदिया विमानतळासाठी ५.९५ कोटी, कराड विमानतळासाठी २० कोटी आणि विविध विमानतळांच्या सोयी सुविधांसाठी १० कोटी असे एकूण ६८.२५ कोटी रुपये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.

१४७ एकर जागेत विस्तारीकरण, ८ एकर क्षेत्र प्राधिकरणाचेगेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे. यासाठी आधी १८२ एकर जागेच्या भूसंपादनाची प्रतीक्षा केली जात होती. जागेची मोजणीही झाली होती; परंतु नंतर १४७ एकर जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय झाला. यातील ८ एकर क्षेत्र हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्त्याखालीच आहे. त्यामुळे १३९ एकर क्षेत्र संपादित करावे लागेल. या १३९ एकर भूसंपादनासाठी निधीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर निधीचा मार्ग मोकळा झाल्याने विस्तारीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

विस्तारीकरणात काय-काय होणार?- चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट म्हणजेच २८३५ मीटर लांबीची आहे. विस्तारीकरणात १२ हजार फुटांची म्हणजे ३६६० मीटर होईल.- धावपट्टी विस्ताराने भविष्यात विमानतळावर कार्गो विमाने, तसेच जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांची उड्डाणे शक्य होतील.- विमानतळावर विमानाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी समांतर ‘टॅक्सी वे’ आवश्यक असते. धावपट्टीचा विस्तारासह समांतर ‘टॅक्सी वे’देखील विस्तारीकरणात होईल.- विमानांची पार्किंग व्यवस्था, नवीन इमारत

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRevenue Departmentमहसूल विभाग