शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 09:23 IST

एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेत वेळापत्रकही जाहीर केले असून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे विमान उड्डाण घेईल.

औरंगाबाद : मोठ्या प्रतिक्षेनंतर तब्बल सहा महिन्यानंतर एअर इंडियाची मुंबई - औरंगाबाद - मुंबई विमानसेवा अखेर मंगळवार दि. २२  सप्टेंबरपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी या विमानाने मुंबईहून २९ प्रवासी शहरात दाखल झाले, तर ४७ प्रवासी औरंगाबादहून मुंबईला रवाना झाले, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ६ महिन्यांनंतर औरंगाबादला मुंबईची हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. मुंबईहून सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेतल्यानंतर औरंगाबाद विमानतळावर सायंकाळी ७ वाजता हे विमान दाखल झाले. त्यानंतर रात्री ८.०६ वा. या विमानाने औरंगाबादहून मुंबईसाठी उड्डाण घेतले. औरंगाबादहून दिल्ली, हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबईची विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात होती. इंडिगोकडूनही आता मुंबई- औरंगाबाद- मुंबई सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेत वेळापत्रकही जाहीर केले असून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे विमान उड्डाण घेईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळAir Indiaएअर इंडियाMumbaiमुंबई