शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटननगर छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक स्थळांबरोबर वाढतेय कृषी पर्यटन

By संतोष हिरेमठ | Updated: May 16, 2024 15:11 IST

जागतिक कृषी पर्यटन दिन विशेष; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७१ कृषी पर्यटन केंद्रे, बैलगाडी, चुलीवरचे जेवण, विटीदांडू अन् बरंच काही...!

छत्रपती संभाजीनगर : बैलगाडी, चुलीवरचे जेवण, नदी, विटीदांडू, झोका अन् ग्रामीण जीवनाचा काहीसा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले कृषी पर्यटन केंद्रांवर वळत आहे. पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक स्थळांबरोबर आता कृषी पर्यटनही वाढत आहे. शहरी भागातील नागरिक या ठिकाणी जाऊन रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा श्वास घेत आहेत.

दरवर्षी १६ मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा केला जातो. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने सप्टेंबर, २०२० मध्ये महाराष्ट्राचे कृषी पर्यटन धोरण जाहीर केले. विशेष म्हणजे, भारतात कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यातूनच राज्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण, शेती, घरगुती पद्धतीचा रुचकर, महाराष्ट्रीयन भोजन, ताजा भाजीपाला, फळे, ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी, घोडेस्वारी, शेतातील विविध हंगामांतील कामे दाखविण्याची सोय, विटीदांडू, झोका आदी ग्रामीण खेळ खेळण्याची सुविधा, पोवाडा, गाेंधळ, आदिवासी नृत्य आदींची सुविधा असते. कृषी पर्यटनासाठी येणाऱ्यांची वर्षभर गर्दी असते. नोव्हेंबर, डिसेंबर, पावसाळ्यात ही गर्दी अधिक असते.

कृषी पर्यटनाला चालनामहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाभ्रमण योजनेच्या माध्यामातून कृषी पर्यटनाला चालना दिली जात आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७१ नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रे असून, आणखी शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी अर्ज दाखल केला आहे.- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

कृषी पर्यटनाची वाढतेय व्याप्तीमहाराष्ट्रात कृषी पर्यटनाची वाटचाल चांगल्या रीतीने सुरू आहे. राज्यात पर्यटन विभागाकडे नोंदणीकृती ६०० पेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्र आहे. त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. पर्यटकांच्या येण्याचे प्रमाणही वाढत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या पर्यटन केंद्रावर ५ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे साधन म्हणूनही कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. यंदाच्या जागतिक कृषी पर्यटन दिनाचा मुख्य कार्यक्रम इटलीत होत आहे. त्यात मी सहभागी झालो आहे.- पांडुरंग तवार, भारतातील कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र