शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच; माणिकराव कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:14 IST

‘अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असे वादग्रस्त विधान केल्यानंतर आणखी एका वादग्रस्त विधानाची भर

छत्रपती संभाजीनगर : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि अजितदादांनी मला हे खाते दिले आहे’, असे विधान त्यांनी शुक्रवारी येथे दोन कार्यक्रमांत केले. कोकाटे यांच्या या विधानाची विद्यार्थी आणि शेतकऱ्यांत मोठी चर्चा झाली.

कोकाटे यांनी बुधवारी नाशिकमध्ये सिन्नरमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना ‘अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर राज्यभरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर त्यांचे नवीन विधान समोर आले आहे. कृषी विभागाच्यावतीने आयोजित प्रगतिशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आणि शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार या दोन्ही समारंभात त्यांनी हे विधान केले. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मला हे कृषिखाते मुद्दाम दिले असून, त्यांचे या खात्याकडे विशेष लक्ष आहे, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्याचीही त्यांची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

कोकाटे यांची यापूर्वीची विधाने१. शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनी काय करावयाचे, तुम्ही कर्जमाफीच्या पैशांचे काय करता, साखरपुडे, विवाह करीत फिरता.२. आता भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो.३. स्वीय सहायकांच्या बदल्यांचे अधिकारसुद्धा कृषिमंत्र्यांना नाहीत.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर