शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

लाच घेताना कृषी पर्यवेक्षक, सहायक चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:13 AM

सिल्लोड कृषी विभागांतर्गत नाला दुरुस्ती काम पूर्ण केल्याबाबत पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही करून लाच घेणारा कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकाला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारी एका चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.१६) संध्याकाळी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सिल्लोड कृषी विभागांतर्गत नाला दुरुस्ती काम पूर्ण केल्याबाबत पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही करून लाच घेणारा कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायकाला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारी एका चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.१६) संध्याकाळी करण्यात आली.कृषी पर्यवेक्षक भारत बन्सीलाल जाधव (४२, रा. औरंगाबाद) यास १५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले, तर कृषी सहायक संतोष अनंता पवार (३८, रा.बालाजीनगर सिल्लोड) यास २५ हजार रुपये लाच घेताना ताब्यात घेतले.सिल्लोड येथील तक्रारदार फर्मच्या वतीने कृषी विभागांतर्गत नाला दुरुस्तीचे काम केले होते. सदर काम पूर्ण केल्याबाबत पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही देण्यासाठी भारत जाधव याने १५ हजार व संतोष पवार याने २५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबादेतील लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख, गणेश पडुरे, रवी देशमुख, रवींद्र अंबेकर, राजपूत यांनी सापळा रचून सोमवारी संध्याकाळी सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाजवळील चहाच्या टपरीवर वरील दोन्ही आरोपींना तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारAgriculture Sectorशेती क्षेत्र