लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भगवान अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शहरात अग्रवाल समाजाच्या वतीने १० ते २४ सप्टेंबरदरम्यान अग्रमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सिडको टाऊन सेंटर येथील अग्रसेन भवनात १० सप्टेंबरपासून अग्रमहोत्सवाला सुरुवात होत आहे. अग्रवाल महिला समिती व अग्रवाल बहु बेटी मंडळाच्या वतीने ‘शक्तीचे अनंत रूप’ या नृत्य नाटिकाचे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. १७ रोजी सकाळी १० वाजता आरोग्य शिबीर व सुंदर बाळांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. ११ वाजता चित्रकला स्पर्धा, दुपारी १२ वाजता ‘पोता रेस’ त्यानंतर बुद्धिबळ , कॅरम सजावट, वन मिनीट गेम शो स्पर्धा घेण्यात येणार आहे. ४ वाजता कुकरी शो व त्यानंतर घोषवाक्य स्पर्धा व प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच आरोग्यम धनसंपदा या विषयावरील चर्चासत्रही घेण्यात येणार आहे. १९ रोजी सायंकाळी ६ वाजता बुगी बुगी डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता दांडियाच्या आयोजनाने अग्रमहोत्सवाची सांगता होणार आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे डॉ.सुशील भारुका, विशाल लदनिया, जगदीश अग्रवाल, अशोक अग्रवाल, निर्मला अग्रवाल, जयश्री अग्रवाल यांच्यासह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.भगवान अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त २१ रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शहागंज येथील गांधी पुतळा चौक येथून ‘अग्र एकता वाहन रॅली’ काढण्यात येणार आहे. यानंतर सिडकोतील अग्रसेन भवन येथे अखंड अग्र भागवत पाठ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल (नवी दिल्ली) व अध्यक्षस्थानी नंदलाल टकसाली असणार आहेत.
अग्रसेन जयंती : अग्रमहोत्सवाला रविवारपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:47 IST