शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Nupur Sharma Prophet remark row: आंदोलन हक्क, पण शांततेत करा; इम्तीयाज जलील यांचे मुस्लीम समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:54 IST

Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर भाजपने केलेली कारवाई पुरेसे नसून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

औरंगाबाद: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने विभागीय आयुक्तालयासमोर आज दुपारी उत्स्फूर्त आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. यावेळी वातावरण बिघडविण्याची परिस्थिती निर्माण झाली असता खासदार इम्तियाज जलील आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आंदोलन करणे आपला हक्क असून ते शांतेत करावे, असे आवाहन खा. जलील यांनी आदोलकांना केले. तसेच नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर भाजपने केलेली कारवाई पुरेसे नसून कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांसह खा.जलील यांनी केली.

पैगंबरावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पेटलेले वातावरण शांत होण्याचे नाव घेत नसून आज नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करत औरंगाबाद, जालना, सोलापूर येथे मुस्लीम समाजाने आंदोलन केले. आज एमआयएमने विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन होते. दरम्यान, दुपारच्या नमाजनंतर शहरातील मुस्लीम समाजाने उत्स्फूर्तपणे विभागीय कार्यालयासमोर जमा झाला. नुपूर शर्माच्या विधानाच्या निषेधार्थ जमावाने जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अचानक मोठा जमाव जमा झाल्याने काही समाजकंटक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, खासदार इम्तियाज जलील आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ आज शहरातील काही भागात बंद पाळण्यात आला. 

केंद्राने कायदा करावाभाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. मात्र, ही कारवाई पुरेसी नाही. शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच देशात धर्मांवर आक्षेपार्ह टीका करणे वाढत जात आहे. यासाठी केंद्राने कायदा करावा.- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील