शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दुपारी रडावे लागले... संध्याकाळी हसावे लागले!

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील १०५ निमशिक्षकांना दुपारी आपल्या व्यथा- वेदना मांडताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याजवळ अक्षरश: रडावे लागले;

औरंगाबाद : जिल्ह्यातील १०५ निमशिक्षकांना दुपारी आपल्या व्यथा- वेदना मांडताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याजवळ अक्षरश: रडावे लागले; परंतु याच शालेय शिक्षणमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आणि सायंकाळपर्यंत या निमशिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, असा आग्रह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्याकडे धरल्यानंतर सायंकाळी खुशीतच हे निमशिक्षक राजेंद्र दर्डा यांना भेटले. यावेळी जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी व सर्व शिक्षा अभियानचे सहायक कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बावस्कर हे या निमशिक्षकांसाठीचे आदेश सोबत घेऊन आले होते. गंगापूर- ११, पैठण- ७, वैजापूर- ७, सिल्लोड- १७, फुलंब्री- २०, औरंगाबाद- ५, कन्नड- १४ आणि खुलताबाद- ४ याप्रमाणे एकूण १०५ निमशिक्षकांनी सायंकाळी आदेश हातात पडताच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे मनापासून अभिनंदन करून आभार मानले. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. दुपारी ते जेव्हा शालेय शिक्षणमंत्र्यांना भेटून आपली गाऱ्हाणी मांडत होते, तेव्हा त्यांना रडू आवरणे कठीण झाले होते. स्वत: राजेंद्र दर्डा हेही भावुक झाले होते. या निमशिक्षकांचा प्रश्न मनावर घेऊन राजेंद्र दर्डा यांनी जोरात हालचाली केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना हा प्रश्न सुटणे कसे योग्य आहे, हे स्पष्ट केले. याचा एक चांगला परिणाम होऊन सायंकाळपर्यंत हे निमशिक्षक शिक्षक बनले. केंद्र सरकार पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात २००१ पासून ६८२ शिक्षक कार्यरत होते. त्यांना वस्तीशाळा स्वयंसेवक संबोधले जायचे. २००९ साली ते वस्तीशाळा निमशिक्षक बनले. नंतर त्यांना पत्राद्वारे डी.एड. करण्याची परवानगी देण्यात आली. डी.एड. केलेले प्रशिक्षित नियमित शिक्षक झाले. त्यांना सहशिक्षकाची वेतनश्रेणी मिळू लागली. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी १ मार्च २०१४ ला हा क्रांतिकारी निर्णय घेतला. १० जुलै २०१४ ला ६८२ पैकी ५७७ जणांना नियुक्ती दिली गेली; परंतु काही कारणास्तव १०५ जण मात्र रखडले. आज दादासाहेब गावंडे, सयाजीराव वाघ, विक्रांत चव्हाण, विजय चव्हाण पंकज वाघ, मनीषा यादव, मीना महालकर, गीता जायभाये, सीमा खंडागळे, नरेंद्र निकम आदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. आदेश घ्यायला आनंदी होऊन सायंकाळी ते पुन्हा शिक्षणमंत्र्यांना भेटले.