शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीनंतर आता कापसावर पाने गुंडाळणाऱ्या हिरव्या अळीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 14:26 IST

बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नरपतंगासोबतच कापसावर आता पाने गुंडाळणाऱ्या(हिरव्या)अळींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे सोयगाव तालुक्यात आज आढळून आले.

सोयगाव (औरंगाबाद ) : बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नरपतंगासोबतच कापसावर आता पाने गुंडाळणाऱ्या(हिरव्या)अळींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे सोयगाव तालुक्यात आज आढळून आले. याबाबत तालुका कृषी विभागाच्या पथकाकडून सकाळी तातडीने परिसरातील शेतात पाहणी करण्यात आली. 

तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून बोंडअळींच्या प्रादुर्भावाने कापूस पिके बाधित होत आहेत. यातच आता कापसावर पाने गुंडाळणाऱ्या(हिरव्या) अळींचा वाढता प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा धडकी भरली आहे. या हिरव्या अळ्या वाढीस लागलेल्या कापसावरील हिरवी पाने गुंडाळून कुरतडत आहेत. यांच्या प्रादुर्भावाने सोयगाव तालुक्यातील कापूस पिकांवरील फुले,पात्यासह पानेही खराब होत असल्याने पिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कृषी विभागाच्या बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण अॅप्सद्वारे निरीक्षणासाठी घेतलेल्या कापसाच्या क्षेत्रात अचानक या हिरव्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याने,कृषी विभागातही चिंतेचे वातावरण आहे. 

प्रयोगामुळे पिके कमकुवत तालुक्यातील कापूस पिकावर कृषी विभागाच्या निरीक्षणाच्या विविध प्रयोगांनी झाडे आणखी कमकुवत होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कीड सर्वेक्षण,सल्ला केंद्र अॅप्सच्या निरीक्षणात सहा गावांच्या ८९१ हेक्टरवरील क्षेत्र बोंडअळींच्या प्रादुर्भावाने बाधित झाल्याचा अहवाल पुण्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संस्थेने दिला असून, मध्येच(पाने खाणाऱ्या)हिरव्या अळींचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या पिकाला घातक ठरला आहे.

कृषी विभागाचे मार्गदर्शन सावळदबारा,घानेगाव तांडा,नांदातांडा या भागात हिरव्या अळींचा वाढता प्रादुर्भाव आढळल्याने कृषी विभागाचे कैलास कुमावत यांच्या सह पथकाने शेतावर जावून पाहणी केली. तसेच यावरील उपाय-योजनांबाबत शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन केले.  

ग्रामसभा व शिवार फेऱ्यातून माहिती तालुक्यात बोंडअळींच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका कापूस पिकांना बसला आहे. याच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या  पथकाने गावांना भेटी देवून शिवार फेऱ्या काढून ग्रामसभाद्वारे विशेष मार्गदर्शन व उपाय-योजनाची माहिती देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीagricultureशेती