शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फुटले, गुलाल उधळला; २ वर्षानी पराभूत उमेदवारांना आले विजयी पत्र, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:31 IST

आनंदाच्या भरात गावात फटाके फोडून जल्लोष

- संजय जाधवपैठण(छत्रपती संभाजीनगर): दोन वर्षापूर्वी पैठण तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांना मंगळवारी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाचे पत्र आले. निवडणुकीत आपण विजयी झाले असून दि १३ रोजी आपण जात वैधता प्रमाणपत्रासह तहसील कार्यालयात उपस्थित रहावे असे या पत्रात नमूद केले होते. पत्र हातात पडल्यावर पराभूत झालेल्या उमेदवारां लॉटरी लागल्याचा आनंद झाला. काही जण गावभर पत्र घेऊन मिरवू लागले याउलट त्यांना पराभूत करून निवडूण आलेल्यांंना मधेच हे काय झाले म्हणून जोराचा झटका बसला. शेवटी निवडणूक विभागाने चुकून पराभूत उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आल्याचा तहसील प्रशासनाने खुलासा केल्यानंतर या सर्व प्रकरणावर पडदा पडला. 

कोवीड महामारीत सन २०२० - २०२१ मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अडचणी आल्या होत्या. यामुळे राज्य शासनाने निवडूण आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यासमोर सादर करण्यास मोठी मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या काळात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि १३ रोजी तहसील कार्यालयात हजर राहण्या बाबत नोटीसा बजावण्यात आल्या. मात्र नोटीस बजावतांना पैठण तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने सरसकट पराभूत व वीजयी उमेदवारांना आपण निवडूण आला असल्याने दि १३ ला हजर रहावे अशा नोटीस बजावल्या आणि गावा गावात राजकीय ड्राम निर्माण झाला. 

पराभूत झालेल्या उमेदवारांनी हजर रहायची गरज नाहीदरम्यान पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांनी या बाबत खुलासा करताना सांगितले की, निवडणूक विभागातून चुकीने या नोटीसा पराभूत उमेदवारांना बजावण्यात आल्या आहेत. पराभूत उमेदवारांनी हजर राहू नये असेही चव्हाण यांनी सांगितले.   काजल संतोष राठोड रा. ब्राम्हणगांव, ता. पैठण यांनाही कागदपत्रासह हजर राहण्याची नोटीस मिळाली. या बाबत त्यांनी ताबडतोब तहसीलदार पैठण यांच्याशी संपर्क साधून खुलासा करून घेतला.

एकाने वाजवले फटाकेएका गावातील पराभूत उमेदवाराने विजयी झाल्याचे पत्र मिळताच गावात फटाके फोडले.जवळच्या कार्यकर्त्यांनी हे कसे झाले असे विचारले असता त्याच्या नेत्याने राईट कार्यक्रम केला असे सांगून नेत्याला क्रेडीट दिले.दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर सदर पराभूत उमेदवार गावातून निघून गेल्याचे समजले.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद