शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी, सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द; गुन्हे नोंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:28 IST

राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक, पर्यवेक्षक बदलले, गुन्हेही दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर : ओव्हर परिसरातील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील सामूहिक कॉपी प्रकरणानंतर परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याशिवाय केंद्रातील संचालक, पर्यवेक्षकांसह संपूर्ण स्टाफही बदलला आहे तसेच संचालक, पर्यवेक्षकांच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.

राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षेतील जीवशास्त्र विषयाच्या पेपरला केंद्राला तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या भरारी पथकाने गुरुवारी (दि.२७) भेट दिली तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते. त्याविषयीचा सविस्तर अहवाल तहसीलदारांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला होता. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे व विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे यांना वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी लाठकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार सदर केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला, सामूहिक कॉपी आहे किंवा कसे याबाबत विभागीय मंडळाला पत्र देण्यात आले तसेच केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करून इतरांच्या नियुक्त्या केल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दिली.

हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणारकेंद्र संचालक जी.जे. जाधव यांनी परीक्षा संचलनात कर्तव्यात कसूर केली. नियमानुसार परीक्षा संचालन केले नाही. अभिलेखे अद्ययावत ठेवले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्याशिवाय एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी होते. त्या हॉलवरील सर्व पाच पर्यवेक्षकांच्या विरोधात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. त्यामध्ये व्ही. यु. वैद्य, पी. जी. गवळी, पी. बी. महाडिक, सय्यद सरवर, वाय. एम. राठोड यांचा समावेश असल्याचेही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी सांगितले.

यांची झाली नेमणूकराजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर संचालक म्हणून शेख फईम यांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय पर्यवेक्षक म्हणून अण्णा शेजूळ, पांडुरंग जाधव, नवनाथ मंत्री, चंद्रकांत चव्हाण, सपना ठाकरे, गजानन पालवे, नितीन देशमुख, विद्या सोनगिरे, एम. डी. राठोड, काळेश्वर भुरे, ज्ञानेश्वर कौशल्ये, जावेद अन्सारी आणि मुनवर शेख यांची नियुक्तीचे आदेश शिक्षणाधिकारी लाठकर यांनी काढले.

संस्थाचालकाच्या नातेवाईकाची धावाधावसंस्थाचालकाचा एक नातेवाईक शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संबंधित नातेवाईकाने जि. प. च्या शिक्षण विभागात शुक्रवारी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यासाठी फोनाफोनी करण्यात येत होती. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा अहवाल अनुकूल करण्यासाठीही प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, जि.प.चे सीईओ विकास मिना यांनी तहसीलदारांच्या अहवालावरून संबंधितांवर कडक कारवाईचे निर्देश दिल्यामुळे सायंकाळच्या वेळी सूत्रे हलली आणि कारवाईची घोषणा करण्यात आली.

इथेही तोच न्याय लावणार का?फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण, वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील परीक्षा केंद्रात गडबड समोर आल्यानंतर संबंधित शाळेच्या संस्थाध्यक्ष व सचिवांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्याचवेळी राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयाच्या संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल होणार का, अशीही चर्चा शिक्षण वर्तुळात करण्यात येत आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र