शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीनंतर तरुण झोपला, तो पुन्हा उठलाच नाही; चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

By राम शिनगारे | Updated: May 10, 2023 13:35 IST

सेंट्रिंगच्या साहित्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन मारहाणीत झाले

छत्रपती संभाजीनगर : बांधकामाच्या साहित्य खरेदीतून झालेल्या वादात चार जणांनी एका तरुणास बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री मुकुंदवाडीतील संजयनगरमध्ये घडली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गौतम भानुदास वाहूळ (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौतमचे भाऊ संजय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास करचुंडे, त्याची पत्नी वैशाली करचुंडे (रा. शिवशाही कॉलनी) यांच्यासह महादेव भालेराव व अश्विनी भालेराव यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. गौतम मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सोमवारी त्याचा आरोपींसोबत बांधकामाच्या साहित्य खरेदीवरून वाद झाला होता. वाद वाढू नये म्हणून गौतमच्या मोठ्या भावाने विलासला घरी बोलावून वाद मिटवून घेऊ, असे समजावून सांगितले होते.

मात्र, दुपारी तीन वाजता गौतम पुतण्या अमरसोबत शिवशाही कॉलनीत गेला होता. तेथे त्यांनी विलास यांना सेंट्रिंगच्या साहित्याची मागणी केली. मात्र, त्यांच्यात भांडण झाले. विलास, वैशाली, महादेव व अश्विनी यांनी गौतमला मारहाण केली. यानंतर गौतम झोपला, तो उठलाच नाही. त्याचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद