शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही प्रशासनाच्या दुष्काळाप्रती शून्य संवेदना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 19:43 IST

जिल्ह्यातील ८६४ पैकी ६०० ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याची माहिती समोर आली

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ ८६४ पैकी ६०० ग्रामपंचायतींत रोहयोची कामे बंदच 

औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० आॅक्टोबर रोजी बैठक घेऊन सतर्कतेबाबत आदेश दिलेले असतानाही प्रशासकीय यंत्रणा दुष्काळाप्रती ‘शून्य संवेदना’ असल्यासारखी वागत असल्याचे मंगळवारी जिल्हा दक्षता व सनियंत्रण, ग्रामीण विकासच्या बैठकीत समोर आले. 

जिल्ह्यातील ८६४ पैकी ६०० ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याची माहिती समोर आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा दुष्काळाबाबत किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले.  १० आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा आढावा बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेने काम करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा किती गांभीर्याने काम करीत आहे, याचे पितळ मंगळवारी उघडे पडले.

जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांकडे किती कामे सुरू आहेत, किती कामे सुरू होतील, याबाबत काहीही ठोस माहिती नव्हती. जि.प., सिंचन, वन, सामाजिक वनीकरणाची किती कामे सुरू आहेत, याची माहिती खा. चंद्रकांत खैरे यांनी बैठकीत विचारली. जिल्ह्यातील ८६४ ग्रामपंचायतींपैकी ६०० ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू नसल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देताच जिल्हाधिकारी चौधरी आणि खैरे अवाक् झाले. दुष्काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी २४ तास ड्यूटीवर असतात, याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे. बैठकीला येताना अधिकाऱ्यांनी अभ्यास करून यावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

...तर बीडीओ जबाबदार गटविकास अधिकाऱ्यांनी (बीडीओ) ग्रामपंचायतींतर्गत कामे सुरू नाहीत, अशी तक्रार करू नये. ग्रामसेवकांऐवजी गटविकास अधिकाऱ्यांना रोहयोच्या कामांप्रकरणी जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बैठकीत दिला. १० आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. अद्यापही प्रशासकीय यंत्रणा हालली नाही. प्रत्येक बीडीओच्या क्षेत्रामध्ये किती कामे सुरू आहेत, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विचारली. अनेकांनी कामांची संख्या सांगून वेळ मारून नेली.

सहाशे ग्रामपंचायती कागदेपत्रीचविभागात बदनाम असलेल्या रोजगार हमी योजनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे; पण जिल्ह्यातील प्रशासनाच्या संवेदना हरवल्यामुळे योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील ६०० ग्रामपंचायतस्तरावर एकही काम सुरू नसल्याचे बैठकीत समोर आले. रोजगार हमी योजनेंतर्गत कागदोपत्रीच कामे दिली जात असल्याचा संशय या निमित्ताने बळावला आहे. 

 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकार