शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या आत्महत्येनंतर पित्यानेही संपविली विष पिऊन जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:22 IST

हृदयद्रावक : वाडी बनोटी परिसरावर शोककळा

बनोटी : एकतर्फी प्रेमाचा घेतलेला आळ सहन न झालेल्या इयत्ता दहावीच्या मुलीने आत्महत्या केल्याच्या पाचव्या दिवशी तिच्या पित्यानेही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना सोयगाव तालुक्यातील वाडी बनोटी येथे गुरुवारी (दि.१४) घडली. छोटू गव्हाणे (४५) असे मृत पित्याचे नाव आहे.पाच दिवसांपूर्वी दिव्या गव्हाणे या दहावीच्या विद्यार्थिनीने गावातील पाच जणांनी एकतर्फी प्रेमाचा आळ घेऊन मारहाण केल्याने राहत्या घरात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली होती. त्या दिवसापासून तिचे वडील कुणाशीही बोलत नव्हते. गुरुवारी पहाटे चार वाजता लवकर उठून ते घरातून निघून गेले. दुपारपर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. वाडी शिवारातील शेतात त्यांचा पुतण्या जितेंद्र गव्हाणे हा शेतात गेला असता त्याला छोटू यांचा मृतदेह आढळून आला. त्याने हे दृश्य पाहून नातेवाईकांना माहिती दिली. यानंतर पोलीस, नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेऊन मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप राजपूत यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पाटील सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद रोडगे, ठाणे अंमलदार सुभाष पवार, दिलीप तडवी, कौतिक सपकाळ, योगेश झाल्टे, दीपक पाटील करीत आहेत.आई, वडील, बहिणीचे छत्र हरपल्याने दोन्ही बालके पोरकेमुलीचा विरह व झालेला अपमान सहन न झाल्याने बाप-लेकीचा असा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. आई, बहिणीच्या पाठोपाठ वडिलांचेही छत्र हरवल्याने दोन्ही बालके (एक १२ वर्षांचा मुलगा व एक ८ वर्षांची मुलगी) पोरके झाले आहेत. मृत दिव्याच्या आईचे यापूर्वीच निधन झालेले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी