शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला

By शांतीलाल गायकवाड | Updated: September 3, 2025 09:23 IST

‘एक मराठा लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला

शांतीलाल गायकवाड 

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या ओटीत आरक्षण टाकणारे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मंगळवारी मध्यरात्री १ वाजता शहरातील गॅलेक्सी रुग्णालयासमोर येऊन थांबला आणि  पाटील, पाटील, पाटील, एक मराठा लाख मराठा...च्या गगनभेदी घोषणांनी  अग्निहोत्र चौक परिसर दुमदुमला.  पाच दिवस उपोषण केल्याने बोलण्याच्या मन:स्थितीत नसलेले जरांगे यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पुढील १५ दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचे डॉक्टरांनी ‘लोकमत’ला मंगळवारी मध्यरात्री सांगितले. 

जरांगे यांना घेऊन आलेली ॲम्ब्युलन्स रुग्णालयासमोर येताच जोरदार आतषबाजी व घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी तरुणांची मोठी गर्दी होती. फटाक्याची आतषबाजी करून जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जरांगे येणार म्हणून रुग्णालयातही फुलांची पखरण करण्यात आली होती.

जरांगे यांच्यावर उपचार करणारे डाॅ. गोविंद चौरे म्हणाले की, उपचार करण्यासाठी त्यांना आयव्ही देण्यासाठी सुई लावताना नस सापडत नव्हती. सुई टोचली तेव्हा वेदनेने जरांगे व्याकूळ झाले. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा रक्तदाब वाढला आहे. रक्तशर्कराही कमी झाला आहे. १५ दिवस त्यांना आराम करण्याची, तसेच उपचाराची गरज आहे.

रुग्णालय परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस आयुक्त नवले, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक सचिन कुंभार व पोलिस निरीक्षक भुजंग यांच्यासह मोठा फौजफाटा  परिसरात तैनात होता. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर