शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्याने राज्यसंस्था निरंकुश - प्रकाश पवार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 20:01 IST

भारतात १८१८ साली अस्तीत्वात आलेल्या राज्यसंस्थेवर तेव्हापासून ते १९७० पर्यंत चळवळींनी अंकुश ठेवला होता. चळवळींच्या धोरणांवर राज्य संस्था निर्णय घेत होती. मात्र ७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. याचा परिणाम राज्यसंस्था निरंकुश सत्ताधिश झाली आहे. हे सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातुन धोक्याचे असल्याचे मत राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात दोनदिवसीय मोईन शाकीर व्याख्यानमालेला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी डॉ. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय राज्यसंस्था आणि चळवळींचे संबंध’ या विषयावर भाष्य केले.

औरंगाबाद : भारतात १८१८ साली अस्तीत्वात आलेल्या राज्यसंस्थेवर तेव्हापासून ते १९७० पर्यंत चळवळींनी अंकुश ठेवला होता. चळवळींच्या धोरणांवर राज्य संस्था निर्णय घेत होती. मात्र ७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. याचा परिणाम राज्यसंस्था निरंकुश सत्ताधिश झाली आहे. हे सामाजिक हिताच्या दृष्टीकोणातुन धोक्याचे असल्याचे मत राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात दोनदिवसीय मोईन शाकीर व्याख्यानमालेला गुरुवारपासून सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. श्रीराम निकम होते. संयोजक डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी डॉ. प्रकाश पवार यांनी ‘भारतीय राज्यसंस्था आणि चळवळींचे संबंध’ या विषयावर भाष्य केले. यात ते म्हणाले, भारतात १८१८ साली राज्य संस्था अस्तित्वात आल्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची चर्चा सुरु झाली. पुढे महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, कृष्णाजी केळुसकर गुरूजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेकांनी राज्य संस्थाही गोरगरीब, वंचितांसाठी कार्य करणारी असली पाहिजे, अशी मांडणी केली. आग्रह धरला. महात्मा फुले यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा रचुन ते कुळवाडीभूषण असल्याचे दाखवून दिले. म्हणजेच शिवाजी महाराजांनी शेतकरी, गोरगरीबांसाठी राज्याची निर्मिती केली. तर आताच्या राज्यसंस्थांनीही त्यांच्यासाठी राज्य राबविले पाहिजे, असा आग्रह महात्मा फुुले धरतात.

यातुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुढेच पाऊल टाकत शोषित, वंचितांच्या न्यायासाठी लढा उभारतात. त्यांच्या जोडीलाच छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड या  सत्ताधिशांनी राज्यसंस्था गोरगरीबांसाठी प्रत्यक्षात राबविली. या चळवळीत स्वत: झोकून दिलेले असल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत स्टेट सोशालिझमची मांडणी केली. राज्यसंस्थेने सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत,‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ योजना राबविल्या पाहिजेत, ही अपेक्षा होती. स्वातंत्र्यानंतर १९४७ ते ६५ या काळात राज्यसंस्था लोकांसाठीच वापरली गेली. चळवळींचा अजेंडा राज्य सरकार स्विकारत होते. मात्र या काळानंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. १९८० पासून चळवळींना वाटू लागले आम्हाला काहीतरी मिळाले पाहिजे, तशी परिस्थितीही सरकारने तयार करुन ठेवली होती. यामुळे चळवळींच्या अस्ताचा प्रारंभ सुरु झालेला होता. जागतिकिकरणानंतर त्यात वेगाने भर पडली, असल्याचेही डॉ. प्रकाश पवार यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक  डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हरी सोनकांबळे यांनी केले. शुक्रवारी डॉ. पवार हे ‘भारजीय राज्यसंस्था व तंत्रज्ञानाचे संबंध’ या विषयाची मांडणी करणार आहेत.

एका पदासाठी चळवळ गहाणमागील काही वर्षांपासून चळवळीच्या प्रमुखाला आमदार, खासदार, मंत्री किंवा इतर कोणते पद दिले की अख्खी चळवळ संबंधितांच्या पायाथ्याशी नेवून ठेवण्याचा प्रकार वाढला आहे. याचा परिणाम राज्यसंस्था चळवळींचा कोणाताही अजेंडा स्विकारणे तर सोडा साधा विचारही करण्यास तयार नसल्याचेही डॉ. पवार म्हणाले.

ही आहेत चळवळींच्या -हासाची कारणेडॉ. प्रकाश पवार यांनी व्याख्यानानंतर खुल्या प्रश्नोत्तरात चळवळींच्या -हासाची कारणे सांगितली. यात चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यांचा तोकडा अभ्यास, लोकांमध्ये मिसळण्याचा आभाव आणि चळवळ घडविण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण नसणे, तसे वातावरण राज्यसंस्थाही निर्माण होऊ देत नाही. ही चळवळीच्या -हासाची कारणे असल्याचे डॉ. पवार म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद